Air India Case Campbell Wilson esakal
देश

Air India Urination Case : ..तर 'ही' घटना टाळता आली असती; Air India च्या सीईओंचं मोठं वक्तव्य

शंकर मिश्रा नावाच्या मद्यधुंद व्यक्तीनं एअर इंडिया विमानात बसलेल्या एका महिला प्रवाशावर लघवी केली होती.

सकाळ डिजिटल टीम

याप्रकरणी एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि व्यवस्थापकीय संचालक कॅम्पबेल विल्सन (Campbell Wilson) यांचं मोठं वक्तव्य समोर आलंय.

Air India Case : एअर इंडिया विमानात (Air India Aircraft) महिलेवर लघवी करणाऱ्या शंकर मिश्राला (Shankar Mishra) अटक करण्यात आलीये. यासोबतच वेल्स फार्गो कंपनीनंही (Wells Fargo Company) त्याला नोकरीवरून काढून टाकलंय.

दरम्यान, याप्रकरणी एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि व्यवस्थापकीय संचालक कॅम्पबेल विल्सन (Campbell Wilson) यांचं मोठं वक्तव्य समोर आलंय. आम्ही चांगलं व्यवस्थापन केलं असतं तर अशा घटना टाळता आल्या असत्या, असं ते म्हणाले आहेत.

या घटनेच्या काही दिवसांनंतर 6 डिसेंबरला पॅरिस-दिल्ली एअर इंडियाच्या (Paris-Delhi Air India) विमानात एका महिला प्रवाशाच्या ब्लँकेटवर आणखी एका मद्यधुंद व्यक्तीनं लघवी केली होती. या दोन्ही प्रकरणांमुळं एअर इंडिया खूप अडचणीत आलीये. पहिली घटना 26 नोव्हेंबरला घडली. जेव्हा शंकर मिश्रा नावाच्या मद्यधुंद व्यक्तीनं एअर इंडियाच्या बिझनेस क्लासमध्ये बसलेल्या एका महिला प्रवाशावर लघवी केली. हे विमान न्यूयॉर्कहून दिल्लीला परतत होतं. या दोन्ही प्रकरणांबाबत एअर इंडियाचं वक्तव्य समोर आलंय.

एअर इंडियाच्या वतीनं सांगण्यात आलंय की, एअर इंडिया विमानात घडलेल्या घटनांबाबत आम्ही चिंतेत आहोत. या कृत्यांमुळं एअर इंडियाच्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. या घटनांबद्दल आम्ही दिलगीरी व्यक्त करत आहोत. एअर इंडियाला हे प्रकरण अधिक चांगल्या प्रकारे हाताळता आलं असतं, पण तसं आमच्याकडून होऊ शकलं नाही. एअर इंडिया या दोन्ही प्रकरणांवर कारवाई करण्यास कटिबद्ध आहे. याप्रकरणी चार केबिन क्रू आणि एका पायलटला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचा दावा एअर इंडियाच्या सीईओंनी केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी हिरव्या रंगात; बँक निफ्टी तेजीत, अदानी समूहाचे शेअर्स घसरले

Amravati Assembly Election 2024 : अनिश्चिततेचे ढग; बंडखोरांनी बिघडविले गणित...विजयाचा दावा कोणाचाच नाही; मतविभाजन ठरविणार आमदार

Back Pain In Winter: हिवाळ्यात पाठदुखीचा त्रास वाढलाय? पेन किलर न घेता 'या' पद्धतीने मिळवा झटपट आराम

Yavatmal Assembly Election : नेत्यांची राजकीय परीक्षा घेणारी निवडणूक...निकालानंतर अनेकांचा राजकीय प्रवास थांबण्याची शक्यता

Vidarbh Election 2024 : वाढलेल्या टक्केवारीने वाढला संभ्रम....चिमूर, राजुरामध्ये भाकरी फिरणार; उमेदवारांचा विजयाचा दावा

SCROLL FOR NEXT