देशात हिवाळा सुरू झाल्याने दिल्ली-एनसीआरमध्येही वायू प्रदूषण (Delhi air pollution) वाढताना दिसत आहे.
देशात हिवाळा सुरू झाल्याने दिल्ली-एनसीआरमध्येही वायू प्रदूषण (Delhi air pollution) वाढताना दिसत आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हरियाणा सारख्या राज्यात वायू प्रदूषण (Air Pollution) वाढल्याचे चित्र आहे. देशातील सर्वात प्रदूषित शहरांपैकी दिल्ली एनसीआरमधील (Delhi NCR) बहुतेक शहरं टॉप-10 मध्ये असून यापैकी उत्तर प्रदेशचा ग्रेटर नोएडा (Greater Noida) पहिल्या स्थानावर, त्यानंतर हरियाणाचा गुरुग्राम दुसऱ्या स्थानावर आहे. सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी पाच उत्तर प्रदेश आणि तीन शहरं हरियाणामधील आहेत.
कर्नाल, ग्रेटर नोएडा, गाझियाबाद, मानेसर, गुरुग्राम, बुलंदशहर, भिवाडी, यमुनानगर, हिसार आणि हापुड हे पहिल्या 10 प्रदूषित शहरांमध्ये अनुक्रमे 1 ते 10 क्रमांकावर होते. कर्नालची प्रदूषित शहरांमध्ये नोंद झालीय. ग्रेटर नोएडा दुसऱ्या स्थानावर होता. या यादीत यूपीची तीन शहरं आणि हरियाणाची 5 शहरं होती. गाझियाबादमध्ये 297, गुरुग्राम 278, मानेसर 284, बुलंदशहर 274, यमुनानगर 267, हिसारमध्ये 267 आणि हापुडमध्ये एक्यूआय 264 होते. AQI मध्ये PM 2.5, (Pm 2.5) पीएम 10 (PM 10), ओझोन, नायट्रोजन वायूंचा स्तर समाविष्ट आहे. सीपीसीबीच्या CPCB आकडेवारीनुसार, देशात अशी 25 शहरं आहेत, जिथं हवेची गुणवत्ता खराब असल्याचे आढळून आलेय. यापैकी 12 शहरं एकट्या उत्तर प्रदेशातील आहेत. यासह खराब हवेच्या गुणवत्तेमुळे हरियाणातील 10 शहरांचा या यादीत समावेश करण्यात आलाय.
जेव्हा प्रदूषणाची पातळी 0-50 पर्यंत असते, तेव्हा हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक कमी परिणाम करत असतो. यानंतर 51-100 पातळी समाधानकारक, परंतु संवेदनशील लोकांना श्वास घेण्यात अडचण येते. 101-200 मध्यम ज्यामध्ये फुफ्फुस, दमा आणि हृदयरोगाने ग्रस्त लोकांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. यानंतर 201-300 पर्यंत स्थिती बिघडत आहे. अशावेळी बहुतेक लोकांना श्वास घेण्यास अडचण निर्माण होते. 301-400 पर्यंतची पातळी खूपच वाईट असून यामुळं श्वसन रोग होऊ शकतो. तर 401-500 ची पातळी अतिशय गंभीर मानली जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.