Plane Ticket Hike eSakal
देश

Plane Fare Hike : ऐन सुट्ट्यांमध्ये विमान कंपन्यांचा धक्का; तिकीटांच्या दरात सुमारे 20 टक्के वाढ!

Domestic Air Travel : ट्रॅव्हल पोर्टल ‘इक्सिगो’च्या विश्लेषणानुसार, एक मार्च ते सात मार्च या कालावधीच्या तुलनेत एक ते सात एप्रिल या कालावधीत काही मार्गांवरील भाडे ३९ टक्क्यांपर्यंत वाढले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Plane Ticket Prices increased : उन्हाळी सुट्टीच्या हंगामात पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांना आता देशांतर्गत विमानप्रवासासाठी अधिक पैसे द्यावे लागणार आहेत. विस्तारा विमानकंपनीने रद्द केलेली विमानउड्डाणे, इंधनाची दरवाढ; तसेच उन्हाळ्यातील प्रवासाची वाढलेली मागणी यामुळे विमानतिकीटांचे दर २० ते २५ टक्क्यांनी वाढले आहे, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी म्हटले आहे.

वैमानिकांच्या समस्यांना तोंड देत, ‘विस्तारा’ने दररोज २५ ते ३० उड्डाणे कमी केली असून, हे प्रमाण त्यांच्या एकूण क्षमतेच्या १० टक्के आहे. ‘गो फर्स्ट’ची दिवाळखोरी आणि ‘इंडिगो’ची ७० विमाने इंजिनच्या समस्येमुळे बंद आहेत. त्यामुळे मागणी आणि पुरवठा यात मोठी तफावत निर्माण झाली आहे. ट्रॅव्हल पोर्टल ‘इक्सिगो’च्या विश्लेषणानुसार, एक मार्च ते सात मार्च या कालावधीच्या तुलनेत एक ते सात एप्रिल या कालावधीत काही मार्गांवरील भाडे ३९ टक्क्यांपर्यंत वाढले आहे.

याच कालावधीत, दिल्ली-बंगळूर विमानफेरीचे एकेरी भाडे ३९ टक्क्यांनी, तर दिल्ली-श्रीनगर उड्डाणासाठी ३० टक्क्यांनी वाढले. दिल्ली-मुंबई सेवांसाठी १२ टक्के आणि मुंबई-दिल्ली सेवांसाठी आठ टक्के वाढ झाली आहे. लडाख, मनाली आणि गोवा यांसारख्या लोकप्रिय देशांतर्गत स्थळांसाठीच्या विमानतिकीटांचे दर २० टक्क्यांनी वाढले आहेत. मात्र, विमानकंपन्यांचे वेळापत्रक सामान्य झाल्यावर काही आठवड्यांत भाडे स्थिर होईल, असे कंपनीने म्हटले आहे. ‘विस्तारा’ ३१ मार्चपासून सुरू झालेल्या उन्हाळ्याच्या वेळापत्रकात दररोज ३०० हून अधिक उड्डाणे करणार आहे, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.

यात्रा ऑनलाइन पोर्टलचे वरिष्ठ उपाध्यक्ष भरत मलिक म्हणाले, ‘‘उन्हाळ्याच्या हंगामात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान मार्गांवर अपेक्षित सरासरी विमान भाडे २० ते २५ टक्क्यांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. विस्ताराची उड्डाणे १० टक्क्यांनी कमी करण्याच्या निर्णयामुळे प्रमुख देशांतर्गत मार्गांवरील विमानतिकिटांच्या किमतींवर परिणाम झाला आहे. दिल्ली-गोवा, दिल्ली-कोची, दिल्ली-जम्मू आणि दिल्ली-श्रीनगर यांसारख्या प्रमुख मार्गांवर तिकीटदर अंदाजे २० ते २५ टक्क्यांनी गगनाला भिडल्या आहेत. विमानप्रवास महागल्यामुळे कमी अंतराच्या प्रवासासाठी मोठ्या संख्येने प्रवासी रेल्वे प्रवासाची निवड करण्याची शक्यता आहे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT