jio voda 
देश

एअरटेल आणि व्हीआय घेतंय शेतकरी आंदोलनाचा फायदा; जिओचा गंभीर आरोप

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- रिलायन्स जिओने व्होडा-आयडिया आणि एअरटेल विरुद्ध तक्रार करत दूरसंचार नियामक प्राधिकरणास पत्र लिहिले आहे. रिलायन्स जिओचा आरोप आहे की वोडा-आयडिया आणि एअरटेल पंजाबच्या शेतकरी आंदोलनाचा फायदा घेत आहेत. टेलिकॉम सेक्रेटरी एस.के. गुप्ता यांना लिहिलेल्या पत्रात रिलायन्स जिओने व्होडा-आयडिया आणि एअरटेलला बोल लावत असे म्हटले आहे की, दोन्ही कंपन्यांनी ट्राय नियमांचे उल्लंघन केले आहे.

उत्तर भारतातील विविध भागांतील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वोडा-आयडिया आणि एअरटेल अनैतिक मार्ग अवलंबत असल्याचा आरोप पत्रात करण्यात आला आहे. या कंपन्या शेतकरी चळवळीने निर्माण झालेल्या रोषाचा फायदा घेण्यासाठी चुकीच्या प्रचाराचा मार्ग स्वीकारत आहेत. रिलायन्स जिओ यांचे म्हणणे आहे की 28 सप्टेंबर रोजी त्यांनी ट्राय यांना आणखी एक पत्र लिहून आक्षेप नोंदविला होता, परंतु असे असूनही या दोन्ही कंपन्यांनी हा कायदा रद्दबातल असल्याचे दर्शवून आपली नकारात्मक जाहिरात सुरू ठेवली आहे.

या दोन्ही प्रतिस्पर्धी कंपन्या त्यांचे कर्मचारी, एजंट आणि किरकोळ विक्रेत्यांमार्फत रिलायन्सविरूद्ध नकारात्मक मोहीम राबवित असल्याचा आरोप रिलायन्स जिओने केला आहे. रिलायन्स जिओने ग्राहकांना चुकीच्या मार्गाने आमिष दाखविण्याच्या प्रयत्नांना जिओनेही विरोध दर्शविला आहे. रिलायन्स जिओने एअरटेल आणि व्होडा-आयडिया ग्राहकांची दिशाभूल कशी करतात याचे फोटो आणि व्हिडिओ पुरावे देखील सादर केले आहेत.
 
व्होडा-आयडिया आणि एअरटेल स्वत: ला शेतकरी अनुकूल आणि रिलायन्स जिओ हे शेतकरीविरोधी असल्याचे भासवत चळवळीला चालना देण्याचे काम करत आहेत. रिलायन्स जिओने असा आरोप केला आहे की दोन्ही कंपन्या देशभरात जियोविरूद्ध खोटा प्रचार करण्यात गुंतल्या आहेत. यामुळे रिलायन्स जिओच्या प्रतिमेला नुकसान होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT