Ajit Doval reappointed as National Security Adviser PK Mishra to Stay Principal Secretary to Prime Minister  
देश

Ajit Doval : लागोपाठ तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी डोवाल; तर PM मोदींच्या मुख्य सचिवपदी मिश्रांची फेरनियुक्ती

NSA Ajit Doval Latest News : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्तीविषयक समितीकडून डोवाल आणि मिश्रा यांच्या नेमणुकीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली, ता.१३ः राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून अजित डोवाल यांची तर पंतप्रधानांच्या मुख्य सचिवपदी पी. के. मिश्रा यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. वरील दोन्ही अधिकाऱ्यांचा कार्यकाळ पाच वर्षांसाठी राहणार आहे. 

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्तीविषयक समितीकडून डोवाल आणि मिश्रा यांच्या नेमणुकीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. डोवाल हे गुप्तचर खात्याचे (आयबी) माजी संचालक आहेत तर मिश्रा हे कृषी खात्याचे सचिव म्हणून सेवानिवृत्त झाले होते. राष्ट्रीय सुरक्षा, गुप्तचर तसच लष्करी घडामोडी विषयक विषयांची जबाबदारी डोवाल यांच्याकडे असेल. मिश्रा यांच्याकडे पंतप्रधान कार्यालयातील नियुक्त्या आणि प्रशासकीय विभागांची जबाबदारी असेल. डोवाल आणि मिश्रा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वासू साथीदार म्हणून ओळखले जातात.

सल्लागारपदी खरे, कपूर...

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांचे सल्लागार म्हणून अमित खरे आणि तरुण कपूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन्ही अधिकाऱ्यांना सचिवपदाचा दर्जा देण्यात आला असून त्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा राहील. अमित खरे हे झारखंड केडरचे तर तरुण कपूर हे हिमाचल प्रदेश केडरचे सेवानिवृत्त अधिकारी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: आज शेअर बाजार बंद राहणार; बीएसई आणि एनएसईवर कोणतेही व्यवहार होणार नाही

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीचा भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन

IND vs AUS : लागली वाट! सर्फराजनंतर सराव सामन्यात आणखी एका प्रमुख फलंदाजाला दुखापत, विराट कोहली तर...

Sweet Potato Patties: सकाळी नाश्त्यात बनवा चटपटीत रताळं पॅटिस, जाणून घ्या रेसिपी

Congress : समाजात फूट पाडण्यासाठीच भाजपने कलम 370 चा मुद्दा जिवंत ठेवलाय, खर्गेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT