Amit shah ajit pawar Sakal
देश

Ajit Pawar: अजित पवार गटाची अमित शहांकडे महत्वाची मागणी; म्हणाले, 'सत्तेत वाटा...'

सकाळ डिजिटल टीम

Ajit Pawar: महाराष्ट्रात येत्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपप्रणीत 'एनडीए'ला लक्षणीय यश अपेक्षित असेल, तर लवकरात लवकर कामाला लागणे गरजेचे असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सांगितल्याचे समजते.

दोन दिवसांपूर्वी नवी दिल्लीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. राज्यात सत्तावाटप योग्य प्रकारे झाले, तरच निवडणुकीत यश मिळेल असेही या तिघांनी शहा यांना सांगितल्याचे समजते.

मंत्रिमंडळ विस्तार लवकरात लवकर व्हावा, हा राष्ट्रवादीचा सुरुवातीपासून आग्रह आहे. आता निदान महामंडळांवरील नेमणुका मार्गी लावा, अशी विनंती या भेटीदरम्यान करण्यात आल्याचेही समजते.

ओबीसींकडे दुर्लक्ष नको

मनोज जरांगे यांच्या उपोषणामुळे ओबीसी समाज नाराज झाला आहे. त्या समाजाकडे दुर्लक्ष होऊ नये, याकडेही लक्ष द्या, असेही या नेत्यांनी सांगितल्याचे समजते.

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका संपल्यावर महाराष्ट्रात लक्ष घालण्याचे आश्वासन शहा यांनी दिल्याचेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yek Number Movie Review: राज ठाकरेंवर सिनेमा मग चर्चा तर होणारच! कसा आहे तेजस्विनीचा 'येक नंबर'?

Assembly Election 2024 : तुतारी फुंकण्यास अनेकजण तत्पर...संधी मिळणार कुणाला? पक्षाने सर्वांनाच ठेवले आशेवर

IND vs AUS : Rohit Sharma ची माघार, मग कोण असेल टीम इंडियाचा कर्णधार? ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी मोठा पेच

Jio Financial Services: जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसने लाँच केले JioFinance ॲप; ग्राहकांना मिळणार मोठ्या ऑफर

Cyber Fraud : फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी...सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले, नागरिकांनी सावध राहण्याची गरज

SCROLL FOR NEXT