Kamlesh Singh NCP MLA joining BJP October 3rd Jharkhand elections esakal
देश

Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का, भाजपने फोडली अजित पवारांची राष्ट्रवादी, 'हा' आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश!

Sandip Kapde

नवी दिल्ली - झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. या पक्षाचे एकमेव आमदार, कमलेश सिंह भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. येत्या ३ ऑक्टोबरला सिंह यांचा औपचारिक भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. हुसैनाबाद मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे कमलेश सिंह हे झारखंडमधील अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या या निर्णयाने राज्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलणार आहेत.

भाजपमधील प्रवेशाची तयारी

कमलेश सिंह यांचा भाजप प्रवेश ३ ऑक्टोबरला रांची येथे होणार असून, त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र सूर्य सिंह आणि समर्थकांचा मोठा गट भाजपमध्ये सामील होणार आहे. सिंह यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, भाजपमध्ये प्रवेश ही फक्त औपचारिकता उरली आहे. सिंह यांनी झारखंडमध्ये जल संसाधन, खाद्य पुरवठा आणि उत्पादन विभागाचे मंत्री म्हणून काम पाहिले आहे.   त्यांच्या या अनुभवामुळे भाजपला राज्यात मोठा फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कमलेश सिंह हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनच पक्षासोबत आहेत, परंतु २०२३ मध्ये पक्ष फुटल्यानंतर त्यांनी अजित पवार गटाची साथ धरली होती. आता भाजपमध्ये प्रवेश करून त्यांनी नव्या राजकीय प्रवासाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपच्या राज्य कार्यालयात आसमचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या उपस्थितीत सिंह यांचा पक्षप्रवेश होणार आहे. त्यांच्या या निर्णयामुळे झारखंडमधील हुसेनाबाद मतदारसंघात भाजपला अधिक बळ मिळेल, असा अंदाज आहे.

भाजपच्या विजयासाठी महत्त्वाचे पाऊल

झारखंडमध्ये यंदाच्या वर्षाअखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि भारतीय जनता पक्ष तसेच आजसू यांच्यातील युती निश्चित मानली जात आहे. अशा परिस्थितीत कमलेश सिंह यांचा भाजपमध्ये प्रवेश हा पक्षासाठी मोठा विजय ठरणार आहे. सिंह हे २००५ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर हुसेनाबाद मतदारसंघातून आमदार झाले होते आणि ते तीन वेळा मंत्रीपद भूषवून गेले आहेत.

सिंह यांचा निर्णय आणि परिणाम

कमलेश सिंह यांच्या भाजप प्रवेशामुळे झारखंडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा फटका बसेल. सिंह यांच्याबरोबर त्यांच्या समर्थकांचा एक मोठा गटही भाजपमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. सिंह यांचे पक्षांतर हे झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादीच्या गटाला कमजोर बनवणारे ठरू शकते.

नव्या राजकीय समीकरणांचा उलगडा

कमलेश सिंह यांच्या भाजप प्रवेशाने झारखंडमधील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटातील या नेत्याच्या निर्णयाने भाजपला राज्यात मोठे बळ मिळेल आणि आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला याचा फायदा होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Meeting : कोतवालांच्या मानधनात १० टक्के वाढ ते राज्यात विशेष शिक्षक पदाची निर्मिती; मंत्रमंडळाच्या बैठकीत झाले 'हे' महत्वाचे निर्णय

Gold Rate: सोने वर्षाच्या अखेरीस 1,00,000 रुपयांच्यावर जाणार; ग्लोबल ब्रोकरेज फर्मने वर्तवला अंदाज

IAS अधिकाऱ्याच्या पत्नीवर गन पॉईंटवर बलात्कार, आरोपींचा जामीन रद्द! कोर्टाने पोलिसांना फटकारले

Purandar Airport: पुरंदर विमानतळासाठी कधी सुरू होणार भूसंपादन? उद्योगमंत्र्यांनी नेमकं काय सांगितले?

Latest Maharashtra News Updates : अमरावती जिल्‍हयामध्‍ये भुकंपाचे सौम्‍य धक्‍के

SCROLL FOR NEXT