Ajmer Sex Scandal Verdict Esakal
देश

अश्लील फोटोंद्वारे ब्लॅकमेल, १०० हून अधिक मुलींचं शोषण; 32 वर्षांनी दोंषींना शिक्षा झालेले 1992 Ajmer Scandal प्रकरण काय?

Ajmer Sex Scandal Verdict: गॅस सिलिंडरच्या जोडणीसंदर्भात १७ वर्षांची मुलगी एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात येते आणि यातून पुढे जे घडलं ते अवघ्या देशाला हादरवणारं होतं.

आशुतोष मसगौंडे

What is the 1992 Ajmer Scandal

अजमेर : १९९२ मध्ये उघडकीस आलेल्या अजमेर सामूहिक बलात्कार प्रकरणातील 6 आरोपींना मंगळवारी पॉक्सो न्यायालयाने दोषी ठरवले. नफीस चिश्ती, नसीम उर्फ ​​टार्झन, सलीम चिश्ती, इक्बाल भाटी, सोहेल गनी आणि सय्यद जमीर हुसैन अशी या नराधमांची नावे असून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. १२ सरकारी वकील, ३० पेक्षा जास्त पोलीस निरीक्षकांच्या कार्यकाळात या खटल्याची सुनावणी झाली. १९९२ ते २०२४ या कालावधीत राजस्थानमध्ये सुमारे सहा वेळा सत्तांतर झाले. न्यायदानासाठी ऐवढा वेळ लागला की या प्रकरणातील १८ ते २० वयोगटातल्या पीडित मुली आता पन्नाशीला पोहोचल्या आहेत. प्रकरणाची तीव्रता ऐवढी भीषण होती की अजमेरमध्ये धार्मिक तेढ निर्माण झाली, शहर बंदची हाक देण्यात आली होती. न्यायदानाची संथप्रक्रिया, नराधमांचा धर्म, त्याला राजकारणाची किनार असे कांगोरे असलेले हे प्रकरण नेमके काय आहे हे जाणून घेऊया.

किशोरवयातल्या मुलींना असं ओढलं जाळ्यात

1992 मध्ये अजमेरच्या प्रतिष्ठित शाळेत १२ वी इयत्तेत शिकणाऱ्या मुलीला घरात गॅस सिलिंडरचं कनेक्शन हवं होतं. तिला राजकारणातही जायचं होतं. काँग्रेस पक्षासाठी काम करण्याची तिची इच्छा होती. ही गोष्ट तिने अजय नावाच्या मित्राला सांगितली. या मित्राने नफीस आणि फारुख चिश्ती यांच्याशी ओळख करून दिली. नफीस आणि फारुख हे युवक काँग्रेसचे अजमेरमधील पदाधिकारी होते आणि राज्यातल्या बड्या नेत्यांशी त्यांची ओळख होती. वासनांध तरुणांनी पहिले त्या मुलीवर अत्याचार केला. यानंतर तिच्या माध्यमातून अन्य मुलींनाही जाळ्यात ओढायला सुरूवात केली. अजमेरजवळील फार्महाऊसवर पार्टीच्या बहाण्याने या मुलींना बोलवायचं, त्यांच्यावर बलात्कार करायचा आणि पीडित मुलींनी वाच्यता करू नये यासाठी त्यांचे आक्षेपार्ह फोटो काढायचे. या प्रकरणात फोटोलॅबमधील कर्मचारीही सहभागी होते. त्यांनी पीडित मुलींचे फोटो सार्वजिनक केल्याने मुलींची मानसिक अवस्था आणखी बिकट झाली.

महागड्या गाड्या, संजय दत्तसारखी वेशभूषा

फारुख आणि नफीस यांची आर्थिक परिस्थिती चांगली होती. शहरात महागड्या गाड्यांमधून फिरणं, संजय दत्तसारखी वेशभूषा यामुळे शहरात त्यांची सर्वत्र चर्चा असायची. शहरात त्यावेळी एकमेव जिम होती आणि दोघंही त्या जिममध्ये जायचे, असं घटनेचं वार्तांकन करणाऱ्या स्थानिक पत्रकाराने 'द प्रिंट' या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते.

देवेंद्रसमोर बरळला आणि प्रकरण उघड झालं

अजमेर सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींमध्ये पुरुषोत्तमचा समावेश होता. पुरुषोत्तमच्या शेजारी राहणारा देवेंद्र जैन हा तरुण प्रौढांचं मासिक चाळत होता. पुरुषोत्तमने त्याच्यासमोर बढाई मारत सांगितले की, 'खरा मसाला' माझ्याकडे आहे.

तो देवेंद्रला घेऊन लॅबमध्ये गेला आणि मुलींचे आक्षेपार्ह अवस्थेतील फोटो त्याला दाखवले. देवेंद्रला प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आले. त्याने दैनिक नवज्योती या वृत्तपत्राला आणि विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना काही छायाचित्र पाठवले आणि हा प्रकार उघड झाला. त्यापूर्वी एका पीडित मुलीने पोलिसांकडे जाण्याचा प्रयत्नही केला. मात्र, आरोपींचं कुटुंब शहरातील वजनदार घराणं असल्याने पोलिसांना कारवाई करता आली नव्हती. वृत्त प्रकाशित झाल्यानंतर विश्व हिंदू परिषदेनेही आंदोलनं केली. दबाव वाढल्यानंतर पोलिसांना कारवाई करावी लागली.

एका आरोपीची आत्महत्या तर एक अजूनही फरार

अजमेर सेक्स स्कँडलमध्ये एकूण 18 जण आरोपी होते. यातील 9 जणांना आधीच शिक्षा झाली आहे, तर एक आरोपी पुरुषोत्तमने १९९४ मध्ये आत्महत्या केली होती. व्यापाऱ्याच्या मुलावर बलात्कार केल्याप्रकरणी आणखी एका आरोपीविरुद्ध वेगळा गुन्हा सुरू आहे. एक आरोपी अल्मास महाराज अद्याप फरार असून, त्याला न्यायालयाने फरार घोषित केले आहे. हा अल्मास अमेरिकेत पळून गेल्याचे चर्चा होत. या प्रकरणात एकूण सहा वेळा आरोपपत्र दाखल करण्यात आले. तसेच १५ हून अधिक पीडित मुलींनी न्यायालयात साक्ष दिली. यातल्या पीडित मुली प्रकरणानंतर दुसऱ्या शहरांमध्ये स्थलांतरित झाल्या. त्यांना सुनावणीच्या वेळी कोर्टात आणणं हे पोलिसांसमोरचं आव्हान होते. या प्रकरणातील 6 आरोपींवरील खटला यावर्षी जुलैमध्ये पूर्ण झाला. त्याचा निकाल न्यायालयाने शुक्रवारी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; निफ्टी बँकेत तेजी, कोणते शेअर्स तेजीत?

IND vs AUS : विराट कोहलीला खुणावतोय राहुल द्रविडचा विक्रम; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर हव्यात फक्त १०२ धावा

तर 'कुछ कुछ होता हैं' मध्ये राणी मुखर्जी ऐवजी दिसली असती ऐश्वर्या राय; 'या' कारणामुळे दिलेला नकार, म्हणालेली-

Stock Market: कोण आहेत FPI आणि FII? त्यांच्यामुळे शेअर बाजार कोसळतो अन् तेजीत येतो?

महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरू, 'अदृश्य' शक्तीने कारस्थान रचून दोन पक्ष फोडले; सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्ला

SCROLL FOR NEXT