गुवाहाटी : आमदार अखिल गोगोई यांना काल शुक्रवारी १९ महिन्यानंतर पॅरोल मिळाल्यानंतर आज ते आजारी आईला भेटण्यासाठी जोरहाटला गेले. मात्र त्यांना त्यांचा मतदारसंघ शिवसागर येथे जाण्यास मनाई करण्यात आली आहे. गोगोई यांना सुधारित नागरित्व कायद्याच्या विरोधात आंदोलन केल्याप्रकरणी NIA ने UAPA कायद्याअंतर्गत अटक केली आहे.
तुरुंगात असलेले गोगोई यांच्यावर सध्या गुवाहाटी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काल दुपारी पॅरोल मंजूर झाल्यानंतर ते रात्री गुवाहटीतील आपल्या घरी गेले. गोगोई यांची पत्नी आणि मुलगा भाड्याच्या घरात राहत असून तेथे ते रात्रभर थांबले. गोगोई यांच्या मुलास कोविडची बाधा झाली होती. आज सकाळी ते जोरहाटला रवाना झाले. जोरहाटला जाण्यापूर्वी त्यांनी पत्रकाराशी संवाद साधला.
ते म्हणाले, आपण रात्रभर झोपू शकलो नाही. माझा मुलगा खूप दु:खी आणि अस्वस्थ आहे. आपण त्याच्यासमवेत संपूर्ण रात्र घालवली. मी त्याला सोबत घेऊन जाऊ शकत नाही. कारण मी पोलिस सुरक्षेत जात आहे. तत्पूर्वी एनआयएच्या विशेष न्यायाधीश प्रांजल दास यांनी काल गोगोई यांना ४८ तासाचा पॅरोल मंजूर केला. हा पॅरोल ते आपल्या सुविधेनुसार घेऊ शकतात, असे न्यायाधीश म्हटले होते. गोगोई यांच्या याचिकेत म्हटले की, गुवाहाटी आणि जोराहट येथील कुटुंबीयांना तसेच शिवसागर येथील नागरिकांना भेटण्याची परवानगी मिळावी. परंतु न्यायालयाने शिवसागरला जाण्याची परवानगी नाकारली. गोगोई यांनी म्हटले की, मी लोकांचे हात जोडून आभार मानू इच्छित आहे. जेलमध्ये असतानाही मला निवडून दिले. मी लवकरच मुक्त होईल आणि आपली सेवा करू शकेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.