akhilesh shivpal and mulayamsingh yadav in one frame  Team eSakal
देश

युपीत पाच वर्षांनी दिसलं 'हे' चित्र; योगींना शह देणार?

उत्तर प्रदेशध्ये समाजवादी पक्षाने चांगलीच कंबर कसली आहे.

सकाळ डिजिटल टीम

UP Assembly Elections 2022 : उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. भाजपला टक्कर देण्यासाठी सपाने चांगलीच कंबर कसल्याचं दिसतंय. अखिलेश यादव, मुलायमसिंह यादव आणि त्यांचे बंधु शिवपाल यादव यांनी एकत्र येत भाजपविरोधात मोठं आव्हान निर्माण केल्याचं पाहायला मिळतंय. याचाच एक भाग म्हणून काल तब्बल ५ वर्षांनंतर यादव कुटुंबाचे प्रमुख मुलायमसिंह यादव, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि त्यांचे बंधु शिवपाल यादव हे एकत्र दिसले. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये राजकीय बदल पाहायला मिळतील अशी शक्यता निर्माण झाली आहे. (Akhilesh, Shivpal and Mulayamsingh Yadav in one frame)

यादव परिवारातील हे तीन नेते यापुर्वी ऑक्टोबर २०१६ मध्ये एकत्र दिसले होते. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पक्षाच्या मुख्य कार्यालयात हे तिघेही एकत्र दिसले होते. त्यानंतर थेट विधानसभा निवडणुकांच्याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा हे तीन नेते एकत्र आल्याचे दिसले. बहुजन समाज पक्षाच्या समाजवादी विजय यात्रा दरम्यान, ईटावा सदर मतदारसंघाचे उमेदवार सर्वेश शाक्या यांच्या प्रचारासाठी यादव परिवारातील तीन नेते एकत्र आले होते. यावेळी स्थानिकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.

उत्तर प्रदेशमध्ये सध्या विधानसभा निवडुकांची रणधुमाळी सुरू आहे. समाजवादी पक्षानं मोठी ताकद लावून वेगवेगळ्या स्थानिक पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे. तर भाजपकडून केंद्रीय नेत्यांची मोठी फौज उत्तर प्रदेशमध्ये उतरवण्यात आलेली आहे. त्यामुळे ही निवडणूक अतिशय रंजक ठरणार असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT