नवी दिल्ली : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले असून भाजपने यूपीसह चार राज्यांमध्ये सत्तेची पुनरावृत्ती केली आहे. मतमोजणीपूर्वी जिथे अखिलेश (Akhilesh Yadav) ईव्हीएममध्ये छेडछाडीचा आरोप करत होते, तिथेच आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही भाजपविरोधात हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. (Mamata Banerjee Reaction On BJP Victory In UP )
चार राज्यांतील भाजपच्या विजयामागे विशाल जनादेश नसून यंत्रणांचा मोठा जनादेश असल्याची टीका केली आहे. केंद्रीय एजन्सींचा (Central Agency) वापर करून आणि हुकूमशाहीच्या माध्यमातून निवडणुका जिंकल्याने 2024 मध्ये भाजपला विजय मिळवून देणार नाही असे देखील ममता यांनी म्हटले आहे. याबाबत एनडीटिव्हीने वृत्त प्रकाशित केले आहे.
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, केंद्रीय एजन्सींचा वापर करून आणि हुकूमशाहीच्या माध्यमातून भाजपाने काही राज्ये जिंकली आहेत, त्यानंतर, काही जण 2024 मध्ये देखील भाजपाला यश मिळेल अशी भविष्यवाणी करत आहेत, पण ते इतके सोपे नसून, दोन वर्षांनी काय होईल हे कोणी सांगू शकत नाही.
अखिलेश यांचा पराभव जबरदस्तीने
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मला वाटतं अखिलेश यादव यांचा पराभव जबरदस्तीने करण्यात आला असून, सत्य बाहेर येण्यासाठी ईव्हीएमची (EVM) फॉरेन्सिक तपासणी झाली पाहिजे असे त्या म्हणाल्या.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.