Akhilesh Yadav sakal
देश

Akhilesh Yadav : ‘ईव्हीएम’वर विश्वास नाहीच;अखिलेश यादव

लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात दमदार यश मिळविणारे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी आज संसदेमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर(ईव्हीएम) तोफ डागली. ‘‘माझा ‘ईव्हीएम’वर आपल्याला कालही विश्वास नव्हता आणि आजही विश्वास नाही.

सकाळ वृत्तसेवा

लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात दमदार यश मिळविणारे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी आज संसदेमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर(ईव्हीएम) तोफ डागली. ‘‘माझा ‘ईव्हीएम’वर आपल्याला कालही विश्वास नव्हता आणि आजही विश्वास नाही. जोपर्यंत ‘ईव्हीएम’ हटविले जात नाही तोपर्यंत समाजवादी पक्ष(सप) या मुद्द्यावर ठाम राहील’’, असाही दावा अखिलेश यादव यांनी केला.

लोकसभेमध्ये राष्ट्रपती अभिभाषणावरील चर्चेदरम्यान उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी ईव्हीएमवर कडाडून टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, की निवडणुकीदरम्यान आचारसंहितेच्या काळात काही जणांवर सरकार आणि निवडणूक आयोग मेहेरबान होते. त्यामुळे कुठे ना कुठे या संस्थेवरच्या निष्पक्षतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे. ही संस्था निष्पक्ष राहिल्यास आपली लोकशाही निकोप राहील. आम्ही राज्यातील सर्व ८० जागा जिंकल्या तरीही ईव्हीएमवर माझा भरवसा नसेल. जोपर्यंत ‘ईव्हीएम’ हटविले जात नाहीत तोपर्यंत समाजवादी कार्यकर्ते शांत बसणार नाही.

निष्पक्ष निवडणूक नाही

संसदेबाहेरही पत्रकारांशी बोलताना अखिलेश यादव यांनी ‘ईव्हीएम’वर शरसंधान केले. ‘ईव्हीएम’ हटविण्याच्या तत्त्वापासून हटणार नाही. विजयानंतरही आम्हाला जाणीव आहे, की ‘ईव्हीएम’द्वारे निष्पक्ष निवडणूक होत नाहीत, अशी टिपणी अखिलेश यादव यांनी केली.

अयोध्येबाबत कोपरखळी

फैजाबादमध्ये भाजपच्या पराभवावरूनही अखिलेश यादव यांनी कोपरखळी लगावली. ‘‘अयोध्येतील (समाजवादी पक्षाचा) विजय हा मतदारांच्या परिपक्वतेचा विजय आहे,’’ असा टोला सत्ताधाऱ्यांना लगावताना अखिलेश यादव यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीला उत्तर प्रदेशात मिळालेल्या यशाच्या निमित्ताने सत्ताधारी भाजपला जोरदार फटकारले. डबल इंजिनाच्या नावाखाली उत्तर प्रदेशला संघर्षाखेरीज काहीही मिळाले नाही, असे ते म्हणाले.

उत्तर प्रदेशात सर्व परीक्षांचे पेपर फुटल्याचा दावा करताना अखिलेश यादव म्हणाले, ‘‘सरकार बेरोजगार तरुणांना नोकऱ्या देऊ शकत नाही. म्हणूनच जाणीवपूर्वक पेपर फोडत आहे.’’ ‘इंडिया’ आघाडीची सत्ता आल्यानंतर अग्निवीर योजना हटविण्यात येईल, असे आश्‍वासनही अखिलेश यादव यांनी दिले. राष्ट्रपती अभिभाषणात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुन्या पेन्शन योजनेचा उल्लेख नसल्याचा उल्लेख करताना अखिलेश यादव यांनी ही योजनाही लागू केली जावी, अशी मागणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election : सट्टाबाजारामध्ये महायुती ‘फेव्हरिट’!महाआघाडीला १ रुपयाला २ रुपये १५ पैसे भाव

Nashik Vidhan Sabha Election: ओझरला रात्री साडेदहापर्यंत मतदान; सुरगाणा, त्र्यंबकेश्‍वर व इगतपुरीच्या मतपेट्या मध्यरात्री जमा

IND vs AUS : स्टंपकडे जाणारा चेंडू लाबुशेनने रोखला, सिराज चांगलाच चिडला; कोहलीने तर बेल्सच उडवल्या..काय हा प्रकार

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

Sanjay Raut: ...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT