yogi 
देश

योगी सरकार बदलणार अलीगढचे नाव

सकाळ डिजिटल टीम

उत्तर प्रदेशात इलाहाबाद, फैजाबाद नंतर आता अलीगढचे नाव बदलण्याची तयारी सुरु आहे.

लखनऊ - उत्तर प्रदेशात इलाहाबाद, फैजाबाद नंतर आता अलीगढचे नाव बदलण्याची तयारी सुरु आहे. जिल्हा पंचायत बोर्डाच्या बैठकीत अलीगढचे नाव बदलून हरिगढ असं करण्याचा प्रस्ताव मंजुर झाला आहे. याचा अहवाल सरकारला पाठवण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा पंचायतीची सोमवारी बैठक पार पडली. यामध्ये नवनियुक्त अध्यक्ष विजय सिंह यांच्या अध्यक्षतेखाली विकास भवन सभागृह परिसरात सर्व सदस्यांच्या उपस्थितीत अलीगढ जिल्ह्याचे नाव बदलून हरिगढ करण्याचा प्रस्ताव मंजूर केला.

गोविंद वल्लभ पंत सभागृहाच्या प्रांगणातील बैठकीवेळी सर्व सदस्य उपस्थित होते. पंचायत अध्यक्ष विजय सिंह यांनी सर्व प्रतिनिधींकडून यावर मत मागितलं. त्यात सर्वांनीच नाव बदलण्याच्या बाजूने मत नोंदवलं. तसंच जिल्ह्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला.

अलीगढचे नाव बदलण्याची मागणी याआधी 2015 मध्ये विश्व हिंदू परिषदेने केली होती. त्यावेळी विश्व हिंदू परिषदेनं हरिगढ हे नाव सुचवलं होतं. अलीगढचं प्राचिन नाव हरिगढ असंच होतं. ते नंतर बदलण्यात आलं होतं असं विहिंपने म्हटलं होतं. त्याआधी 1992 मध्ये मुख्यमंत्री असताना कल्याण सिंह यांनी हरिगढ असं नाव करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांना यश आलं नव्हतं.

उत्तर प्रदेशातील अनेक मोठ्या शहरांची नावे याआधी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बदलली आहेत. यामध्ये इलाहाबादचे प्रयागराज तर फैजाबादचे अयोध्या असे नामकरण करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Helicopter: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोडक्यात बचावले! हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग; काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Champions Trophy 2025 : पाकिस्तानात या, खेळा अन् मॅच झाल्यावर झोपायला दिल्लीत जा! PCB चा टीम इंडियासमोर अजब प्रस्ताव

Vidhansabha Election 2024 : महायुतीत ४५ जागांच्या वाटपावर खल; जागा सोडण्यावरून स्थानिक पदाधिकारी आक्रमक

रणबीर- आलियाच्या बांद्रामधील घराची पहिली झलक समोर; नेटकऱ्यांनी केल्या भन्नाट कमेंट, म्हणाले- हे काय बनवलंय भाऊ..

Sports News on 18th October 2024: भारताचे कसोटी सामन्यात पुनरागमन ते पाकिस्तानचा इंग्लंडविरूद्ध दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT