नवी दिल्ली- उत्तराखंडमध्ये सुरु असलेल बचावकार्य यशस्वी झाले आहे. तब्बल १७ दिवसानंतर ४१ कामगार बोगद्यामधून बाहेर आले आहेत. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे देखील मजुरांना बोगद्यातून बाहेर काढत असताना उपस्थित होते. एनडीआरएफ, एसडीआरएफ, भारतीय लष्कर आणि केंद्रीय एजेन्सी घटनास्थळी तैनात होते. यातील काही प्रमुख लोकांनी बचावकार्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. (All 41 workers trapped in Uttarakhand tunnel evacuated after 17 days who was the hero in operation)
आयएएस अधिकारी नीरज खैरवाल यांना सिल्क्यारा बौगदा दुर्घटनेचा नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. गेल्या दहा दिवसांपासून ते संपूर्ण ऑपरेशनची धुरा सांभाळत होते.खैरवाल दर तासाला घटना स्थळापासून सीएमओ आणि पीएमओला अपडेट देत होते. ते उत्तराखंड सरकारचे सचिव देखील आहेत.
क्रिस कूपर दशकांपासून मायक्रो-टनलिंग विशेषज्ञ म्हणून काम करत आहेत. या बचावकार्यासाठी त्यांना खास करुन बोलवण्यात आलं होतं. ते १८ नोव्हेंबरला घटनास्थळी आले होते. त्यांचा अनुभव खूप कामाला आल्याचं सांगितलं जातं. कूपर यांच्यामुळे कार्याला गती मिळाली. ते ऋषिकेश कर्णप्रयाग रेल्वे परियोजनेचे आंतरराष्ट्रीय सल्लागार आहेत.
भारतीय सैनेचे माजी लेफ्टिनेंट जनरर आणि एनडीआरएफ टीमचे सदस्य सैय्यद अता हसनैन उत्तराखंड बोगदा दुर्घटनेमध्ये राष्ट्रीय आपत्ती नियोजन प्राधिकरणाच्या भूमिकेत देखरेख करत होते. हसनैन श्रीनगरमध्ये असलेल्या भारतीय सैनेच्या जीओसी १५ कोरचे सदस्य होते. त्यांनी बचाव कार्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचं सांगितलं जातं.
अनोर्ल्ड डिक्स बचावकार्यात महत्त्वाच्या भूमिकेत होते. त्यांच्याकडून प्रत्येक गोष्टीची अपडेट मिळत होती. डिक्स हे वैज्ञानिक आणि भूमिगत बोगदा तज्ज्ञ आहेत. ते २० नोब्हेंबरला घटनास्थळी आले होते. सर्व मजुरांना बाहेर काढण्यात येईल अशी खात्री त्यांनी दिली होती. डिक्स भूमिगत निर्माण कार्यातील गुंतागुंतीबाबत सल्ला देतात. बोगदा निर्माण कार्यातील अग्रणी म्हणून त्यांची ओळख आहे.
मायक्रो टनलिंग टीम, मॅन्यूअल ड्रिलिंग टीम आणि सहा रॅट होल उत्खनन करणाऱ्या सहा विशेषज्ञांना घटनास्थळी बोलवण्यात आलं होतं. मजुरांसाठी टाकलेल्या ८०० एमएम पाईपची देखरेख यांच्या नेतृत्त्वात झाली आहे. राज्य आणि केंद्रीय एजेन्सीसह स्थानिक ड्रिलिंग विशेषज्ञ, पर्यावरण विशेषज्ञ, एनडीआरएफ आणि एनडीआरएफचे सदस्य आणि भारतीय लष्कराच्या जवानांना याठिकाणी तैनात करण्यात आलं होतं. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.