amartya sen  esakal
देश

Amartya Sen: नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांचा विरोधकांच्या एकजुटीला पाठिंबा; म्हणाले, लोकशाहीत अनेकदा...

विरोधकांची दुसरी बैठक सध्या बंगळुरुत सुरु आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : नोबेल पुरस्कार विजेते भारतीय अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या होत असलेल्या एकजुटीच्या प्रयत्नांचं स्वागत केलं आहे. लोकशाही बऱ्याचदा सत्तेच्या वाटा मागत असते, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना पाठिंबा दर्शवला आहे. (Amartya Sen welcomes opposition unity moves)

नुकत्याच झालेल्या भारत दौऱ्यादरम्यान ८९ वर्षीय अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी आपल्या घरी पीटीआयला एक मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी मणिपूरच्या हिंसाचारावर तसेच देशातील सध्याच्या स्थितीवर भाष्य केलं आहे. (Latest Marathi News)

सत्तेच्या भागीदारीची मागणी

सेन यांनी म्हटलं, लोकशाही कायम सत्तेच्या भागीदारीची मागणी करत असते. पण बहुमताच्या मतांनी अल्पसंख्यांकांची ताकद कमी केली आहे. त्यामुळं त्यांना खूपच अनिश्चितेचा काळ अनुभवावा लागतो आहे. (Marathi Tajya Batmya)

विरोधकांची एकजूट

सध्याच्या स्थितीत कोणत्याही प्रकारच्या शक्तीमध्ये संतुलन राखणं गरजेचं आहे. त्यामुळं विरोधीपक्षांनी एकमेकांना कमजोर करण्याऐवजी एकमेकांसोबत यायला हवं. अशाच प्रकारची पावलं आता पडताना दिसतं आहेत, जे पाटणा इथं झालेल्या बैठकीतून दिसून आलं आहे, असंही सेन यांनी म्हटलं आहे.

२४ विरोधीपक्षांची बंगळुरुत बैठक

दरम्यान, विरोधीपक्षांची पहिली बैठक पाटण्यात झाल्यानंतर आता दुसरी दोन दिवसीय बैठक बंगळुरुत होत आहे. यामध्ये काँग्रेससह २४ विरोधीपक्षांचा समावेश आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं या बैठकीत अनेक मुद्द्यांवर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

मणिपूरच्या हिंसाचारावर मांडली भूमिका

मणिपूरच्या स्थितीवर बोलताना अमर्त्य सेन म्हणाले, "केंद्राकडून मणिपूरच्या प्रकरणात योग्य आणि शक्तीशाली हस्तक्षेपाची गरज आहे. मला वाटतं होतं, पंतप्रधान मणिपूरबाबत न्यायाचं आणि संतुलित विधान करतील, असंही त्यांनी म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

BJP With Mns: शिवडीत मनसेच्या बाळा नांदगावकरांना भाजपचे समर्थन, आशीष शेलारांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT