LIC  sakal media
देश

IPOच्या पार्श्वभूमीवर LIC मध्ये थेट परकीय गुंतवणुकीला मंजुरी

लवकरच एलआयसीचा आयपीओ शेअर बाजारात दाखल होणार आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) मध्ये थेट परकीय गुंतवणुकीला (FDI) परवानगी देण्याच्या दुरुस्तीला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळं आता, LIC मध्ये स्वयंचलित मार्गाने 20 टक्क्यांपर्यंत थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी असणार आहे. आगामी आयपीओच्या पार्श्वभूमीवर हा केंद्रानं ही मंजुरी दिली आहे. (amendment to permit FDI in LIC has been approved from central govt)

उद्योगाच्या अंदाजानुसार, FY 2022 साठी 78,000 कोटी रुपयांच्या निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सरकारला प्रस्तावित शेअर विक्रीतून 63,000 ते 66,000 कोटी रुपयांचा निधी उभारण्याची सरकारला अपेक्षा आहे. LIC ने अद्याप IPO ची किंमत जाहीर केलेली नसली तरी बाजाराचा अंदाज आहे की IPO प्रति शेअर रु 2,000 ते 2,100 असण्याची शक्यता आहे.

सध्याच्या FDI धोरणात LIC मध्ये परदेशी गुंतवणुकीसाठी कोणतीही विशिष्ट तरतूद नाही. जी LIC कायदा, 1956 अंतर्गत स्थापित केली गेली आहे. LIC साठी FDI कमाल मर्यादा आता सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या बरोबरीने करण्यात आली आहे. सरकारने गेल्या वर्षी विमा क्षेत्रातील एफडीआय मर्यादा 49 टक्क्यांवरून 74 टक्क्यांपर्यंत वाढवली असताना, विशिष्ट कायद्याद्वारे कव्हर केलेल्या एलआयसीचा त्यात समावेश नव्हता.

“सध्याच्या एफडीआय धोरणानुसार, सरकारच्या परवानगीनुसार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी एफडीआयची मर्यादा २० टक्के असल्याने, एलआयसी आणि अशा इतर कॉर्पोरेट संस्थांसाठी २० टक्क्यांपर्यंत परदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढे, भांडवल उभारणीची प्रक्रिया जलद करण्यासाठी, उर्वरित विमा क्षेत्राप्रमाणेच अशा प्रकारची एफडीआय ऑटोमॅटिक मोडवर ठेवण्यात आली आहे,” अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आमच्या विचारधारा वेगळ्या होत्या पण... बाळासाहेबांचं नाव घेण्यावरून प्रियांका गांधींचं नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर

Vastu Tips: कामधेनूची मूर्ती ऑफिसमध्ये कोणत्या दिशेला ठेवावी? वाचा वास्तूशास्त्र काय सांगतं

Farmer : हिरव्या मिरचीने आणले डोळ्यांत पाणी...तोडणी बारा तर विक्रीसाठी पंचवीस रुपये; पीकांच्या लागवडीचाही खर्च निघेना

Latest Maharashtra News Updates live : संभाजीनगर विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाच्या परिक्षेत्रात पोलिसांना सापडले ५ कोटी रोख

Gold Price: सोने 6,000 आणि चांदी 12,000 रुपयांनी स्वस्त; ट्रम्प यांच्या विजयानंतर सोनं स्वस्त का होत आहे?

SCROLL FOR NEXT