Amit Shah directs anti-terror agencies NSG NIA to send teams to Kerala after blast at convention centre 
देश

Keral Blast Update : केरळमध्ये साखळी बॉम्बस्फोट! अमित शाहांनी तात्काळ पाठवल्या NIA, NSG टीम

रोहित कणसे

एर्नाकुलमयेथील योहावा ख्रिश्चन कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर केंद्र सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. या स्फोटानंतर केंद्र सरकारने एनएसजी, एनआयएची पथके केरळमध्ये पाठवली आहेत. एक दिवस आधी केरळमध्ये हमासच्या समर्थनार्थ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या हा स्फोटांमुळे खळबळ उडाली असून केंद्र सरकार या स्फोटांना अत्यंत गांभीर्याने पाहत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गृहमंत्री अमित शाह यांनी तपास यंत्रणांना तपास पूर्ण होईपर्यंत केरळमध्येच थांबण्यास सांगितले आहे. सकाळी नऊ वाजता कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सलग पाच स्फोट झाले. या स्फोटात एकाचा मृत्यू झाला आहे. तर याशिवाय ३६ जण जखमी झाले असून त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे.

एका दिवसापूर्वी येथील कॅथलिक चर्चने हमासचा निषेध केला होता. तसेच केरळमधील सभेत हमासचे माजी प्रमुख ज्या पद्धतीने बोलतात आणि त्यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या जातात, ते योग्य नाही,. दहशतवाद्यांचा गौरव होता कामा नये असे चर्चने म्हटले होते. त्यानंतर आता प्रार्थना सभेदरम्यान चर्चवरच हल्ला करण्यात आला आहे. केरळमधील मलप्पुरममध्ये जमात-ए-इस्लामीच्या सहयोगी संघटनेने हमासच्या समर्थनार्थ रॅली काढली होती.

हजारोंच्या गर्दीत स्फोट

या स्फोटात दहशतवादी हल्ल्याच्या अंगाने पाहिले जात आहे. दहशत पसरवण्यासाठी चर्चमध्ये हा हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. रविवारच्या प्रार्थनावेळी चर्चमध्ये हजारो लोक उपस्थित होते. यावेळी तेथे काही ज्यूही उपस्थित होते, अशी ही माहिती आहे. केरळमधील हमासच्या रॅलीमध्ये अनेक आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आले होते. हमासच्या नेत्याने केवळ ज्यूंविरोधातच नव्हे, तर हिंदूंविरोधातही विधाने केली.

दरम्यान केरळमध्ये स्फोट झाल्याचे प्रकरण केंद्र सरकारही गांभीर्याने घेतले आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून घटनेची माहिती घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan Video : पुण्यातील मानाच्या गणपतींचं विसर्जन; ढोल-ताशांचा दणदणाट अन् तरुणांचा उत्साह...

Ganesh Visarjan 2024 LIVE : गणेश विसर्जन मिरवणुकीत DJ च्या आवाजाने एकाचा मृत्यू, तर तिघांची प्रकृती गंभीर

Instagram Teen Accounts: 18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

IND vs BAN: सोशल मीडियातून हिंसाचाराची चर्चा सुरू ती खरी की खोटी? बांगलादेश मालिकेवरून आदित्य ठाकरेचा सरकारवर हल्लाबोल

Lebanon Blast: लेबनानमध्ये बॉम्बस्फोट, इराणच्या राजदूतासह एक हजार जण जखमी, खिशात ठेवलेल्या पेजर्सने...

SCROLL FOR NEXT