Amit Shah has BJP ended 27-year Gujarat politics established rule of law congress Bhupendra Patel sakal
देश

Amit Shah : भाजपने लांगूलचालन संपविले; अमित शहा

अमित शहा; गुजरातमध्ये कायद्याचे राज्य आणले

सकाळ वृत्तसेवा

अहमदाबाद : ‘‘गुजरातमधील २७ वर्षांच्या सत्ताकाळात भाजपने लांगूनचलनाचे राजकारण संपुष्टात आणले असून कायद्याचे राज्य स्थापन केले असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी सांगितले. तसेच विविध मुद्द्यांवरून काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. अहमदाबाद शहरातील घाटलोडिया मतदारसंघातून निवडणूक लढविणारे गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या प्रचारार्थ शहा यांची सभा आज झाली. काँग्रेसवर टीका करताना ते म्हणाले, की अयोद्धेतील राम मंदिर उभारणीवरून काँग्रेस भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या नेत्यांची टिंगल करीत असे. २०२४मध्ये मंदिराचे काम पूर्ण होणार असून राहुल गांधी यांनी मंदिराला भेट द्यावी.

गुजरातमधील जनतेने वांशिक दंगलींचा अनुभव घेतला आहे. १९८५ ते १९९५ या काळात बिगर भाजप सरकारमध्ये अशा दंगली वारंवार होत असत. वर्षातील ३६५ दिवसांपैकी २५० दिवस राज्यात संचारबंदी असे. अहमदाबादेतील एखाद्या भागात कुटुंबातील सदस्य गेल्यास घरातील महिला त्यांच्यासाठी प्रार्थना करीत असत. पण भाजप सरकारने परिस्थिती सुधारणा केली असून आता कोणीही वातावरण बिघडविण्याची हिंमत करू शकत नाही, असेही ते म्हणाले.

गुजरातमधून सर्व लतीफ आणि लज्जू शेख (राज्यातील दोन गुन्हेगार) यांचा आधीच खातमा केला आहे. आज २० वर्षांच्या युवकांना संचारबंदी काय, याची कल्पनाही नाही. आम्ही लांगूनचलनाचे राजकारण संपुष्टात आणले असून कायद्याचे राज्य आणले आहे, असे शहा म्हणाले.

प्रचारसभेनंतर शहा आणि पटेल यांनी सोलापर्यंत ‘रोड शो’ केला. तेथे पटेल यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज अधिकाऱ्यांकडे दाखल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची मायभूमी असलेल्या गुजरातमध्ये सलग सातव्यावेळी सत्तेवर येण्‍याचा भाजपचा प्रयत्न आहे. राज्यात काँग्रेसबरोबर आम आदमी पक्षानेही भाजपला आव्हान दिले आहे.

द्वारकात अनेक वर्षांपासून जागोजागी दिसणारी अनधिकृत बांधकामे व बेकायदा मझार पाडल्याबद्दल मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचे अभिनंदन करतो. तेथे लोकांपेक्षा मझारच जास्त होत्या.

- अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT