नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी, ‘देशाच्या अति पूर्वेकडील पहिले गाव असलेल्या ‘किबिथू’ला देशवासीयांनी आवर्जून भेट द्यावी आणि येथील गौरवशाली इतिहासातून प्रेरणा घ्यावी असे आवाहन गुरुवारी केले.
किबिथू’ हे अरुणाचलमधील भारत-चीन सीमेवरील गाव असून, भारताची सीमा या गावापासून सुरू होत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सोमवारी (ता.१०) या गावाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर होते. शहा यांनी गुरुवारी येथील निसर्ग सौंदर्याची झलक दाखवणारा एक व्हिडिओ त्यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर केला.
यामध्ये तेथील हिमाच्छादित पर्वतरांगा, धबधबे, नदी यांचे सुंदर चित्रण दाखविण्यात आले आहे. ‘‘देशातील पहिले गाव असलेल्या किबिथू येथील माझ्या दौऱ्यादरम्यान कॅमेऱ्याच्या साहाय्याने चित्रित केलेला सुरेख निसर्ग. खरोखरच अरुणाचल प्रदेशला अप्रतिम निसर्ग सौंदर्य लाभले आहे,’’ असे शहा यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.
त्याचप्रमाणे त्यांनी या ट्विटमध्ये, देशवासीयांना अरुणाचल प्रदेशला आणि विशेषतः ‘किबिथू’ला भेट देण्याचे आवाहन केले आहे.
अमित शहा यांनी किबिथू येथे सोमवारी(ता. १०) केंद्र सरकारच्या व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्रॅम (व्ही.व्ही.पी.) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन केले. या प्रकल्पाअंतर्गत ईशान्येकडील दोन हजार ९६७ गावांचा सर्वांगीण विकास करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात सुमारे ६६२ गावे निवडण्यात आली असून त्यापैकी ४४५ गावे ही अरुणाचल प्रदेशातील आहेत.
शहा यांनी बुधवारी देखील अशाच प्रकारे व्हिडिओ पोस्ट करत, किबिथू आणि वालाँग या दरम्यानच्या नव्याने निर्माण करण्यात आलेल्या मार्गाचे कौतुक केले होते. १९६२च्या भारत चीन युद्धात किबिथू आणि वालाँग येथे युद्ध लढले गेले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.