देश

नागालँडमध्ये चुकीच्या लष्करी ऑपरेशनवर अमित शहांचं स्पष्टीकरण; म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : नागालँडमध्ये भारतीय लष्कराच्या पॅरा स्पेशल दलाच्या एलिट युनिटद्वारे चुकीच्या पद्धतीने ऑपरेशन राबविण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या ऑपरेशनमध्ये दहशतवादी समजून ग्रामस्थांवरच गोळीबार करण्यात आला आहे. यामध्ये १४ निष्पाप ग्रामस्थांचा (Nagaland Civilian Death) मृत्यू झाला. या घटनेवरुन सध्या लोकसभेत रणकंदन माजलं आहे. विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. या सगळ्या प्रकरणावर आता गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेमध्ये निवेदन दिलं आहे.

ओटिंग, मोन येथे अतिरेक्यांच्या हालचालींची माहिती लष्कराला मिळाली होती. त्या आधारे 21 कमांडोंनी संशयित परिसरात हल्ला केला. त्याठिकाणी एक वाहन देखील पोहोचले, त्याला थांबण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. दहशतवाद्यांची वाहतूक होत असल्याच्या संशयावरून हा गोळीबार करण्यात आला, असं स्पष्टीकरण अमित शहांनी दिलं आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, एका मेजरच्या नेतृत्वाखालील लष्कराच्या पथकाने शनिवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास तिरू-ओटिंग रस्त्यावर एका पिक-अप ट्रकवर गोळीबार केला ज्यामध्ये आठ जण होते. त्यापैकी सहा जण जागीच ठारे झाले, तर इतर दोघांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. ट्रकमधील सर्व स्थानिक कोळसा खाण कामगार असल्याची माहिती आहे. तसेच ट्रकमधून कुठलेही शस्त्र किंवा दारूगोळा सापडला नसल्याची माहिती आहे. त्यानंतर शेकडो ग्रामस्थांनी सैन्याच्या टीमवर दगड आणि चाकूने हल्ला केला. त्यामुळे लष्कराच्या तुकडीने स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला. यामध्ये सुरुवातील ५ ग्रामस्थांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेकजण जखमी झाले. तसेच एक कमांडो देखील शहीद झाला असून सात जवान जखमी झाले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rashmi Shukla : निवडणूक संपताच रश्मी शुक्लांची पोलिस महासंचालकपदी पुन्हा नियुक्ती

Cancer : गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग घेतोय महिलांचा जीव

Ekanth Shinde: एकनाथ शिंंदे पुन्हा मुख्यमंत्री नाही झाले तर महायुतीला बसणार फटका ? वाचा महत्त्वाची बातमी

Maharashtra Winter : राज्यभरात गारठा वाढला! किमान तापमानाचा पारा घसरू लागला

IPL 2025 Auction नंतरचे सर्व १० संघ; कोणाकडे सर्वात जास्त खेळाडू, तर कोणाकडे किती उरले पैसे; पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT