नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नागरिकता संशोधन कायद्याबाबत (CAA) नुकतचं एक मोठ विधान केलं आहे. देशातील कोविड लसीरणाची मोहिम संपल्यानंतर लगेचच CAA ची अंमलबजावणी केली जाईल, असं त्यांनी म्हटलं आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभेतील विरोधीपक्ष नेते सुवेंदू अधिकारी यांच्या भेटीनंतर त्यांना आश्वस्त करताना ते बोलत होते. (Amit Shah says will implement CAA once Covid vaccination drive is over)
सुवेंदू अधिकारी यांनी पार्लमेंट हाऊसमध्ये मंगळवारी अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालमधील भाजपच्या कामांची माहिती त्यांना दिली तसेच पक्षाला भेडसावत असलेल्या अडचणीही सांगितल्या. या भेटीनंतर शहांनी आपल्याला सांगितलं की, बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या CAA कायद्याची कोविड लसीकरणाच्या बुस्टर डोसची मोहिम संपल्यानंतर अंमलबजावणी करण्यात येईल, अशी माहिती अधिकारी यांनी दिली. इंडियन एक्स्प्रेसनं याबाबत वृत्त दिलं आहे.
दरम्यान, यावेळी अधिकारी यांनी राज्यात सत्ताधारी तृणमूल काँग्रेससोबत सुरु असलेल्या संघर्षाची माहिती दिली. तसेच आपण तृणमूलच्या अशा १०० नेत्यांच्या नावाची यादी अमित शहांकडे दिली ज्यांच्या भ्रष्टाचाराची कारवाई होणं गरजेचं आहे, असंही अधिकारी यांनी सांगितलं.
नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये ११ डिसेंबर २०१९ रोजी मंजूर झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचं नोटिफिकेशनही निघालं. पण केंद्र सरकारनं अद्याप या कायद्यासाठी नियमावली तयार केलेली नाही. कारण यासंदर्भात ईशान्य भारतातील राज्यांसह देशातील विविध भागांतून अद्याप मागण्या येत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.