Amit Shah Viral Video Tamilisai Soundararajan Esakal
देश

Viral Video: चंद्राबाबूंच्या शपथविधीवेळी स्टेजवरच राडा! अमित शाहांनी माजी राज्यपालांना...; नेमकं काय घडलं पाहा

आशुतोष मसगौंडे

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्या शपथविधी समारंभात तेलंगणाच्या माजी राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन यांना फटकारताना गृहमंत्री अमित शहा यांची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे वाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कॅमेऱ्यात कैद झालेल्या क्लिपमध्ये तमिलिसाई अमित शहा यांना अभिवादन करताना दिसत आहे, त्यानंतर अमित शाह त्यांना परत बोलावतात आणि त्यांचाशी गंभीर चेहरा आणि हातवारे करत काहीतरी बोलताना दिसत आहेत.

यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे, अनेक युजर्स त्यांच्या संभाषणाचे वेगवेगळे अंदाज लावत आहेत.

अनेक एक्स युजर्सनी या घटनेचा संबंध तामिळनाडू भाजपमध्ये, प्रदेशाध्यक्ष के अन्नामलाई आणि तमिलिसाई सुंदरराजन यांच्या समर्थकांमध्ये सुरू असलेल्या वादाशी जोडला आहे.

दरम्यान, या घटनेनंतर तामिळनाडूतील सत्ताधारी पक्ष द्रमुकने अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. द्रमुकचे प्रवक्ते सर्वानन अन्नादुराई यांनी एक्सवर पोस्ट केली आणि म्हटले, " हे कसले राजकारण आहे? तामिळनाडूतील एका प्रथितयश महिला राजकारण्याला जाहीरपणे फटकारणे योग्य आहे का? हे सर्वांना कळाले अमित शहांनाही कळायला हवे. हा अतिशय चुकीचा प्रकार आहे!”

तामिळनाडूमधील लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवानंतर तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष के अन्नामलाई आणि तमिलिसाई सुंदरराजन यांच्यात तणाव निर्माण झाल्याची चर्चा आहे.

तामिळनाडू लोकसभा निवडणुकीत भाजपला एकही जागा जिंकता न आल्याने वाद सुरू झाला.

पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पराभवासाठी अण्णामलाई यांना जबाबदार धरले आहे. त्याच्यामुळे AIADMK ने भाजपसोबतची युती तोडली ज्यामुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले.

एआयएडीएमकेचे नेते आणि माजी राज्यमंत्री एसपी वेलुमणी यांनी थेट अण्णामलाई यांच्यामुळे महत्त्वाच्या निवडणुकांपूर्वी भाजपसोबतच्या पक्षाची युती तुटल्याचा आरोप केला.

तर चेन्नई दक्षिण मतदारसंघातून पराभूत झालेल्या तमिलिसाई यांचा असा विश्वास होता की, भाजप-एआयएडीएमके युती कायम राहिली असती तर 35 पर्यंत जागा मिळू शकल्या असत्या.

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत तमिलिसाईंनी निवडणुकीतील पराभवावरनंतर अण्णामलाई यांचा समाचार घेतला. ही टीका अण्णामलाई यांच्या समर्थकांना आवडली नाही, त्यांनी यानंतर तमिलिसाईंवर ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून टीका सुरू केली. प्रत्युत्तर म्हणून, तमिलिसाईंच्या समर्थकांनी अण्णामलाई यांच्यावर जोरदार टीका केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

SCROLL FOR NEXT