Amit Shah  sakal
देश

Amit Shah : भाजपच्या नेतृत्वाखालीच महायुतीची सत्ता;अमित शहांचे प्रतिपादन,राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याचे सूतोवाच

सकाळ वृत्तसेवा

पुणे : लोकसभेला कमी जागा मिळाल्या म्हणून कार्यकर्त्यांनी हताश होऊन डोक्याला हात लावून बसू नये. याची कसर विधानसभा निवडणुकीत भरून काढा. महाराष्ट्रातील आत्तापर्यंतचा सर्वांत मोठा विजय महायुतीला मिळणार असून, भाजपच्या नेतृत्वाखाली राज्यात सत्ता स्थापन होणार आहे आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट करत अप्रत्यक्षपणे भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याचे सूतोवाच केले. आजच्या मेळाव्याद्वारे त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा बिगुलही फुंकला.

महाराष्ट्र प्रदेश भाजपतर्फे कार्यकर्त्यांचे अधिवेशन रविवारी म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्रीशिवछत्रपती क्रीडासंकुल येथे आयोजित केले होते. या अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी अमित शहा यांनी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी जोशपूर्ण भाषण केले.

अमित शहा म्हणाले, ‘‘कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रचंड कष्टामुळे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. पण आपल्या जागा कमी झाल्याने कार्यकर्ते थोडे संभ्रमात आहेत. जागा कमी झाल्या असल्या तरी आपण पुन्हा सत्तेत आलो आहोत. साठ वर्षांत पहिल्यांदा एका नेत्याला‌ तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे तुम्ही नाराज होऊ नका. जी काही कसर राहिली आहे ती विधानसभेला भरून काढा. यावेळी आपल्याला इतिहासातील हा सर्वांत मोठा विजय मिळणार आहे’’.

राहुल गांधींचा अहंकार नष्ट होईल

लोकसभा निवडणुकीत आपण निश्‍चित केलेल्या लक्ष्यापेक्षा कमी म्हणजे २४० जागा मिळाल्या. २०१४, २०१९ आणि २०२४ च्या निवडणुकांमधील काँग्रेसच्या जागांची बेरीज केली तरी त्यांच्या तेवढ्या जागा होत नाहीत. निवडणूक हारूनसुद्धा राहुल गांधी यांना प्रचंड अहंकार आला आहे. महाराष्ट्र, झारखंड आणि हरियानातील विधानसभा निवडणुकीनंतर राहुल गांधींचा अहंकार नष्ट होईल, असा टोला शहा यांनी लगावला.

मोहोळ भर चौकात उत्तर देतील

केंद्रात आणि राज्यात शरद पवारांची १० वर्षे सत्ता होती. या कालावधीत महाराष्ट्राला एक लाख ९१ हजार कोटी रुपये केंद्राकडून मिळाले. पण नरेंद्र मोदींच्या १० वर्षांच्या काळात महाराष्ट्रामध्ये १० लाख पाच हजार कोटींची विकास कामे झाली आहेत. याचा सगळा

हिशोब आम्ही तयार ठेवला आहे. विरोधकांनी सांगावे पुण्यातील कोणत्या चौकामध्ये येऊन तुम्हाला ही माहिती द्यायची मुरलीधर मोहोळ तुम्हाला उत्तर देतील, असे आव्हान शहा यांनी विरोधकांना दिले आहे. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनीही शिट्ट्या आणि टाळ्या वाजवून याचे स्वागत केले.

अमित शहा म्हणाले...

- भाजप सत्तेसाठी नाही तर विचारावर चालणारा पक्ष

- आम्ही कलम ३७० हटविले, राम मंदिर बांधले, नक्षलवाद, दहशतवाद संपविला

- पुढील ३० वर्षे भाजप विजयी होत राहणार

- गरिबांचे कल्याण काँग्रेस व त्यांचे मित्र पक्ष नाही तर भाजपच करू शकते

- पुढच्या दोन वर्षांत देश नक्षलवाद मुक्त होईल.

- काँग्रेसने आरक्षण व संविधानाबाबत चुकीचा प्रचार केला, उलट भाजपने दहा वर्षांत आरक्षण मजबूत केले

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान जेवढा काँग्रेसने केला‌ तेवढा इंग्रजांनीही केला नाही

- भाजपने साखर कारखान्यांचा १० हजार कोटींचा प्राप्तीकर माफ केला. हे काम १० वर्ष कृषिमंत्री असूनही पवारांना करता आले नाही.

उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष

पवारांकडून भ्रष्टाचाराला संस्थात्मक रूप

देशात आमची सत्ता आल्यापासून आम्ही एकदाही दूध पावडर आयात करण्याचा निर्णय घेतला नाही. हा निर्णय शरद पवार केंद्रात कृषिमंत्री असतानाच घेतला गेला होता. शरद पवार हे देशातील भ्रष्टाचाराचे सर्वांत मोठे सरदार आहेत. त्यांनी देशातील भ्रष्टाचाराला संस्थात्मक स्वरूप देण्याचे काम केले आहे. हे घरोघरी जाऊन सांगा, अशा शब्दात शहा यांनी पवार यांच्यावर हल्ला चढविला.

पवार येताच मराठा आरक्षण गायब

२०१४ ते २१०५ हा देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाल राज्याच्या विकासाचा होता. याच काळात फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले. २०१९ मध्ये शरद पवार सत्तेत येताच मराठा आरक्षण रद्द झाले. आता पुन्हा एकनाथ शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची सत्ता आल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळाले आहे. २०२४च्या विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवारांची सत्ता आल्यास मराठा आरक्षण पुन्हा गायब होईल. आरक्षण कायम ठेवायचे असल्यास भाजपला पुन्हा सत्ता मिळाली पाहिजे, असे सांगत शहा यांनी पवारांना लक्ष्य केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT