देश

"राम, कृष्ण, शिव मुस्लिमांचे पूर्वज; भारतीय संस्कृतीसमोर व्हावं नतमस्तक"

सकाळ डिजिटल टीम

लखनऊ : उत्तर प्रदेशचे संसदीय कामकाज राज्यमंत्री आनंद स्वरुप शुक्ला यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी म्हटलंय की, भगवान राम, कृष्ण आणि शिव हे भारतीय मुस्लिमांचे पूर्वज आहेत. मुस्लिमांनी 'भारतीय भूमी आणि संस्कृती'ला नमन करायला हवं. शुक्ला यांनी दावा केला आहे की, पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने इस्लामिक राज्य साकारण्याचा मानस ठेवणाऱ्या विचारधारेचा नायनाट करुन देशात हिंदूत्व आणि भारतीय संस्कृतीचा झेंडा फडकवला आहे.

शुक्ला यांनी काल गुरुवारी शाम बलियामध्ये राज्य सरकारच्या साडेचार वर्षांच्या कर्तृत्वाचा लेखाजोखा मांडताना म्हटलंय की, भारतातील मुस्लिमांचे पूर्वज भगवान राम, कृष्ण आणि शंकर आहेत. त्यांना काबाची धरती पाहण्याची गरज नाहीये. त्यांनी भारताची भूमी आणि संस्कृतीला नमन करायला हवं. पुढे शुक्ला यांनी म्हटलंय की, सीरिया आणि अफगाणिस्ताननंतर वेगवेगळ्या देशाच्या काही लोकांना जगाला एक इस्लामिक राज्य बनवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भारतामध्ये देखील काही लोकांनी असाच विचार केला होता. मात्र मोदी आणि योगींच्या केंद्र आणि राज्य सरकारने हिंदूत्व आणि भारतीय संस्कृतीचा झेंडा फडकवून या विचारधारेचा नायनाट केला आहे.

पोस्टर्सबाबत घेतली हरकत

अलिकडेच संभलमध्ये लावल्या गेलेल्या वादग्रस्त पोस्टर्सचा उल्लेख करत त्यांनी म्हटंल की, इस्लामी दहशतवाद्यांना समाजवादी पार्टीचा पाठिंबा आणि तालिबानच्या समर्थनार्थ संभलचे खासदार शफीकुर रहमान बुरके यांचे विधान अशा कृतींना प्रोत्साहन देते. या आठवड्याच्या सुरुवातीला, एएमआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेपूर्वी संभलला 'गाझी' (इस्लामिक योद्धे) ची भूमी म्हणणारी पोस्टर्स लावण्यात आली होती. भाजपने पोस्टर्सवर तीव्र आक्षेप घेतला होता, त्यानंतर ते ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) च्या कार्यकर्त्यांनी काढून टाकले होते.

गाझीयांचा पूर्णपणे नायनाट

शुक्ला म्हणाले की, उत्तर प्रदेशच्या मातीतून गाझी पूर्णपणे पुसले गेले आहेत. अशा शक्ती भविष्यात डोके वर काढू शकणार नाहीत. अशा शक्तींवर योगी सरकार कडक कारवाई करत आहे. पुढे ते म्हणाले की, असदुद्दीन ओवैसीच्या पूर्वजांना हैदराबादला एक वेगळे राष्ट्र बनवायचे होते, ते यशस्वी होऊ शकले नाहीत, अशा मानसिकतेचे लोक अजूनही तेथे आहेत, ते मूर्ख लोक आहेत आणि त्यांचे पूर्वज भीतीने मुस्लिम झाले होते. ते म्हणाले की, मोदी आणि योगी सरकारमध्ये अशा प्रकारची विचारसरणी फुलू शकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT