उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी त्याच्या लग्नामुळे चर्चेत असतो. अनंत आणि राधिका मर्चंट यांचा प्रि-वेडींग सोहळा पार पडला होता. त्या सर्व चर्चांमध्ये अनंतने जंगली प्राण्यांसाठी सुरू केलेल्या एका बचाव पूनर्वसन केंद्राचीही चर्चा होती.
जंगली प्राण्याची काळजी घेण्यासाठी अनंतने रिलायन्स फाऊंडेशनचा वनतारा प्रोजेक्ट सुरू केला आहे. नुकतेच वनताराच्या टीमने हत्तीला आणि तिच्या पिल्लाला जीवनदान दिले आहे. या घटनेचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओनुसार, डॉक्टरांची एक टीम तात्काळ जामनगरहून त्रिपुरातील कैलाशहरच्या उनाकोटी जिल्ह्यात पाठवण्यात आली. तेथे पोहोचल्यानंतर त्यांनी हत्तीवर तातडीने उपचार करण्यास सुरुवात केली. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोक वनतारा टिमच्या या धाडसाचे कौतुक करत आहेत.
हा व्हिडिओ तिथे उपस्थित असलेल्या एका महिलेने बनवलेला असून ईमेल केल्यानंतर २४ तासात हे लोक इथे पोहोचले आणि ते हत्तीवर उपचार करत आहेत, असे यातील महिला सांगत आहे. इतक्या लांबचा पल्ला गाठत हत्तींवर उपचार करण्यासाठी आलेल्या सर्वांचे मी आभार मानते, असेही ती महिला या व्हिडिओत म्हणत आहे.
रिलायन्स फाऊंडेशनचे वंतरा प्रोजेक्ट काय आहे?
अनंत अंबानी यांना जंगली प्राणी अतिशय आवडतात. त्यामुळेच त्यांनी वनतारा हा प्रोजेक्ट सुरू केला आहे. 'स्टार ऑफ द फॉरेस्ट' असा वंताराचा अर्थ होतो. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स फाऊंडेशनने या प्रोजेक्टची सुरूवात केली आहे.
गुजरातमधील रिलायन्सच्या जामनगर रिफायनरी कॉम्प्लेक्सच्या जवळ वंतारा प्रोजेक्ट आहे. यामध्ये 3,000 एकरात एलिफंट सेंटर आहे. इथे हत्तींसोबत इतर 43 प्रजातींचे 2,000 हून अधिक जंगली प्राणी आहेत. जंगली प्राणी आहेत. जे जखमी आहेत त्यांच्यावर इथे उपचारही केले जातात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.