haryana nuh violence reason ANI
देश

Haryana Violence: दंगलखोरांनी कार पेटवली; अशी झाली महिला न्यायाधिश आणि तीन वर्षाच्या लेकीची सुटका

सकाळ डिजिटल टीम

Nuh haryana violence

नवी दिल्ली- हरियाणा राज्यात सुरु असलेल्या हिंसाचाराऱ्या पार्श्वभूमीवर एक धक्कदायक माहिती समोर आली आहे. नूह जिल्ह्याचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या कारला काही समाजकंटकांकडून आग लावण्यात आली. न्यायाधिशांनी कसेबसे पळून जाऊन आपला जीव वाचवला. धक्कादायक म्हणजे यावेळी त्यांची तीन वर्षाची मुलगीही त्यांच्यासोबत होती. पोलिस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या एफआयआरमधून ही माहिती उघड झाली आहे.

अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अंजली जैन आणि त्यांची तीन वर्षाची मुलगी यांना आपला जीव वाचवण्यासाठी पळून जावे लागले. जमावाने त्यांच्यावर दगडफेक केली, तसेच हवेत गोळीबार केला असं सांगण्यात आलं आहे. त्यानंतर जमावाने त्यांच्या कारला आग लावली. नूह पोलिस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या एफआयआरमध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे.

न्यायाधिश अंजली जैन, त्यांची लहान मुलगी आणि त्यांच्या स्टाफला जुन्या बसस्टँडमध्ये असलेल्या वर्कशॉपमध्ये आश्रय घ्यावा लागला. त्यानंतर काही वकीलांच्या मदतीने त्यांना तेथून बाहेर पडता आले. तेक चंद यांच्या तक्रारीनुसार एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एफआयआरनुसार, दुपारी एक वाजता अंजली जैन, त्यांची मुलगी आणि स्टाफ कर्मचारी सियाराम हे वॉल्क्सवेगन कारमधून एसकेएम मेडिकल कॉलेजमध्ये औषधी खरेदी करण्यासाठी गेले होते. परत येत असताना जवळपास दोनच्या सुमारास १०० ते १५० लोकांच्या जमावाने त्यांच्यावर हल्ला केला.

दंगलखोर जमावाने त्यांच्यावर दगडफेक सुरु केली. दगडं कारच्या पाठीमागील ग्लासला लागले. दंगलखोरांनी हवेत गोळीबार सुरु केला. यानंतर कारमधील सर्वांनी बाहेर पडत जीव वाचवण्यासाठी पळ काढला. आम्ही बस स्टँडमधील वर्कशॉपमध्ये आश्रय घेतला. काही वकील मित्रांच्या मदतीने आमची सुटका झाली, असं एफआयआरमध्ये सांगण्यात आलं आहे.

हरियाणाच्या नूह जिल्ह्यातून सुरु झालेला हिंसाचार इतर जिल्ह्यातही पसरला. आतापर्यंत सहा लोकांचा या हिंसाचारात मृत्यू झाल्याची माहिती आहे. यात दोन पोलिस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले आहेत. परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचं सांगितलं जात आहे, पण अजूनही काही भागात हिंसाचाराच्या घडना समोर येत आहेत. हरियाणातील हिंसाचाराची धग देशातील इतर राज्यात पोहोचत असल्याचं चित्र आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambegaon Shirur Assembly election : दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात उमेदवार कोण?

Latest Maharashtra News Updates : कोल्हापूरला परतीच्या पावसाने झोडपले

IND vs NZ 1st Test : नशीबानं थट्टा अशी मांडली...! Rohit Sharma ची विचित्र विकेट पडली, कॅप्टनलाही विश्वास बसेना

Diwali Dos and Don'ts: दिवाळीला कोणत्या गोष्टी कराव्या अन् कोणत्या नाही, वाचा एका क्लिकवर

Manini De : छोट्या पडद्यावर परतणार मानिनी डे; झी टीव्हीवरील मालिकेत साकारणार 'ही' महत्वाची भूमिका

SCROLL FOR NEXT