rahul Rahul gandhi noticed from Germany BJP aggressive Digvijay Singh tweet Criticism  sakal
देश

Rahul Gandhi : नाव सेम, मतदारसंघही सेम, २०१९ सालीच लढले; आणखी एक राहुल गांधी ठरले अपात्र

मानहानीच्या खटल्यात दोषी ठरल्यानंतर २३ मार्च रोजी काँग्रेसच्या राहुल गांधींना अपात्र ठरवण्यात आले.

वैष्णवी कारंजकर

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची लोकसभेतून अपात्रता आणि त्याचे पडसाद चर्चेत असताना, २०१९ मध्ये केरळमधील याच वायनाड जागेवरून निवडणूक लढवणाऱ्या आणखी एका ‘राहुल गांधी’नांही निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यात आले.

भारतीय निवडणूक आयोगाने २९ मार्च रोजी सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकार्‍यांना पाठवलेल्या लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ च्या कलम १०A अन्वये अपात्र ठरलेल्या व्यक्तींच्या नियमित यादीत, राहुल गांधी के ई नावाची व्यक्ती आहे. ते कोट्टायम इथले रहिवासी आहेत. या यादीनुसार, ९ सप्टेंबर २०२१ रोजी त्यांना तीन वर्षांच्या कालावधीसाठी अपात्र ठरविण्यात आले.

कलम १०A अन्वये, निवडणूक लढल्यानंतर निवडणूक खर्चाचा हिशेब निवडणूक आयोगाकडे न भरणाऱ्यांना तीन वर्षांच्या कालावधीसाठी अपात्र ठरवले जाते. काँग्रेसच्या राहुल गांधींचे नाव यादीत नव्हते. मानहानीच्या खटल्यात दोषी ठरल्यानंतर २३ मार्च रोजी त्यांना अपात्र ठरवण्यात आले तरी ट्रायल कोर्टाने कायदेशीर उपाय शोधण्यासाठी त्यांना ३० दिवसांची मुदत दिली होती.

राहुल गांधी के ई, ३३ वर्षांचे होते तेव्हा त्यांनी वायनाडमधून अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवली होती. ही निवडणूक काँग्रेसच्या राहुल गांधींनी ७ लाखांहून अधिक मतांनी जिंकली होती. राहुल गांधी के ई, रघुल गांधी के असे सारख्या नावाचे दो उमेदवार होते. राहुल गांधी के ई यांना २,१९६ मते मिळाली, तर रघुल गांधी केई यांना ८४५ मते मिळाली.

अपात्रतेबद्दल विचारले असता, राहुल गांधी के ई म्हणाले की त्यांनी २०१९ ची निवडणूक लढवली होती परंतु पुढे काहीही बोलण्यास नकार दिला. ते म्हणाले, “मी तो राहुल गांधी नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे उमेदवार विनोद शेलार आघाडीवर

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे भाजपकडून असलेले उमेदवार हेमंत रासने यांची विजयाच्या दिशेने घौडदौड

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT