corona Gustavo Basso
देश

24 तासांत कोरोनावर मात; अ‍ॅंटिबॉडी कॉकटेलचा प्रयोग यशस्वी

कार्तिक पुजारी

कोरोना महामारीचा प्रकोप आणखी थांबलेला नाही. जगभरातील वैज्ञानिक विषाणूवर प्रभावी उपचार शोधण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न करत आहेत.

नवी दिल्ली- कोरोना महामारीचा प्रकोप आणखी थांबलेला नाही. जगभरातील वैज्ञानिक विषाणूवर प्रभावी उपचार शोधण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न करत आहेत. अशात हैदराबादमधील Asian Institute of Gastroenterology ने कोरोना विषाणूवर उपचारासाठी एक महत्त्वाचा शोध लावल्याचा दावा केला आहे. कोरोना विषाणूला हरवण्यासाठी ही उपचार पद्धती माईलस्टोन ठरु शकते, असं म्हटलं जातंय. म्युटन्ट होत असलेल्या कोरोना विषाणूवर ही उपचार पद्धती प्रभावी ठरतेय का? याबाबत संशोधन सुरु केले आहे. (Antibody Cocktail Treatment Given to 40 Patients in Hyderabad Symptoms Vanished in 24 Hours )

वैज्ञानिकांनी 40 कोरोना रुग्णांना दोन वेगवेगळ्या औषधांचा कॉकटेल डोस दिला होता. यातून आश्चर्यकारण असे परिणाम दिसून आले आहेत. 24 तासांच्या आत कोरोना रुग्णांमधील लक्षणे नाहीसे झाले असून ते बरे झाले आहेत, असं हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. नागेश्वर रेड्डी यांनी सांगितलं. डोस दिल्यानंतर रुग्णांची RT-PCR(sic) टेस्ट करण्यात आली होती. डॉ रेड्डी पुढे म्हणाले की, 'अमेरिकेतील संशोधनातून ब्रिटिश, ब्राझिलियन आणि साऊथ आफ्रिकेच्या व्हेरिएन्टवर हे कॉकटेल प्रभावी ठरत असल्याचं दिसून आलंय. आम्ही 40 रुग्णांवर ही चाचणी केली. यात 100 टक्के रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.'

माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना दिला होता कॉकटेल

मोनोक्लोनल अँटिबॉडी थेरपी ( monoclonal antibody therapy ) रुग्णांमधील आजाराची तीव्रता कमी करते. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना हा कॉकटेल देण्यात आला होता. त्यानंतर ही उपचार पद्धती प्रकाशात आली. अँटिबॉडीचा सिंगल कॉकटेल डोस रुग्णांना 3 ते 7 दिवसांनतर दिला जातो. मोनोक्लोनल अँटिबॉडी थेरपीमध्ये Casirivimab आणि Indevimab ही दोन औषधे कॉकटेल करुन वापरले जातात. याची किंमत जवळपास 70 हजार रुपये (1000 डॉलर) आहे.

थेरपी प्रभावी ठरल्याने याची मागणी वाढत आहे. असे असले तरी डॉक्टरांनी याच्या जास्तीचा वापर टाळण्यास सांगितलं आहे. विशिष्ट परस्थितीमध्येच याचा वापर केला जावा, कारण जास्तीचा वापर रुग्णांसाठी हानीकारण ठरु शकतो. त्यामुळे काही विशिष्ट लोकांवरच याचा वापर केला जावा, असं डॉ. रेड्डी म्हणालेत. ही थेरपी घेतलेल्या रुग्णांनी तीन महिन्यानंतरच कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कारण, शरीरात मोठ्या प्रमाणात अँटिबॉडी निर्माण झालेल्या असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्रामधील मतमोजणीपूर्वी नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात जिलेबी बनवण्याची तयारी सुरु

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT