नवी दिल्ली : बिहार निवडणुकीत प्रचारासाठी भाजपाने एक प्रचारगीत जाहीर केलं आहे. 'बिहार में ई बा' असं या गाण्याचे बोल आहेत. याचा अर्थ असा आहे की बिहारमध्ये हे घडलं आहे. या गाण्याद्वारे भाजपाने आपल्या बिहारमधील विकासकामांचा लेखाजोखा मांडला आहे. या गाण्याद्वारे भाजपा बिहारमध्ये प्रचार करत आहे. मात्र, आता या गाण्याबाबत एक नवीनच वाद समोर आला आहे.
दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी असा आरोप केला आहे की हे गाणं त्यांनी त्यांच्या एका गाण्यावरुन चोरलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच अनुभव सिन्हा आणि मनोज वाजपेयी यांनी एक भोजपूरी गाणं प्रदर्शित केलं होतं. 'बंबई में का बा' असं हे गाणं असून या गाण्यालाच कॉपी करुन भाजपाने आपलं प्रचारगीत बनवल्याचा अनुभव सिन्हांचा आरोप आहे.
आपल्या एका सोशल मीडियावरील पोस्टमध्ये त्यांनी लिहलंय की, कृपया, या गाण्यााल ऐका. या गाण्या एकदाही बिहार शब्दाचा उल्लेख नाहीये. हे सांगण्यापासून मी स्वत:ला थांबवू शकत नाहीये. जर मी स्वत:ला थांबवलं तर ते माझ्यासोबतच बरोबर होणार नाही. माझ्या मित्रांनी मला याबाबत न बोलण्यास सांगितलं आहे. भाजपाने बिहार निवडणुकीसाठी एक गाणं लाँच केलं आहे. हे सरळ सरळ माझ्या बंबई में का बा या गाण्याची नक्कल आहे, जे मी 6 आठवड्यांपूर्वी रिलीज केलं होतं.
त्यांनी पुढे म्हटलंय की, या गाण्याचे माझ्याकडे 100 टक्के कॉपीराईट आहेत. भाजपा सरकारमध्ये आहे आणि याप्रकारे एखाद्या कलाकाराच्या कॉपीराईटचा सन्मान न करणं हे अत्यंत चूक आहे. कुणी एकानेही माझ्याकडून परवानगी देखील घेतली नाहीये. भाजपा या गाण्यासाठी सहज पैसे देऊ शकते. काही कारण नक्कीच यामागे असेल की त्यांनी असं केलं. या प्रकरणाला न्यायालयापर्यंत घेऊन जाणं हे माझ्या ताकदीच्या पलीकडचं आहे. मी ही अपेक्षा करतो की भाजपाचे समर्थक मला ट्रोल करणार नाहीत.
बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणूका तीन टप्प्यात होणार आहेत. पहिला टप्पा 28 ऑक्टोबर रोजी होणार आहे तर दुसरा आणि तिसरा टप्पा हा तीन आणि सात नोव्हेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 10 नोव्हेंबर रोजी लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.