आमच्याकडे अनेक मोठ्या योजना आहेत. आम्ही उत्तर प्रदेशला नव्या युगात आणू असंही केंद्रीय मंत्री अनुप्रिया यांनी म्हटलं.
लखनऊ - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी भदोहीत केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल (Anupriya Patel) यांनी PM मोदी आणि CM योगींच्या नावे मते मागितली आहेत. अनुप्रिया पटेल यांनी म्हटलं की, मोदी सरकार बॉम्बस्फोटातून युक्रेनमध्ये (Ukraine) अडकलेल्या भारतीय (India) मुलामुलींना सुरक्षित मायदेशी आणत आहे. युक्रेनने रशियावर (Russia) हल्ला केला आहे. तिथं चौफेर हल्ले होतायत, मात्र, सरकारचे चार मंत्री तिथे गेले असून नागरिकांना विमानात बसवून बॉम्बस्फोटातून सुरक्षित वाचवून घरी आणत आहेत.
भदोहीत प्रचारसभेत भाषण करताना अनुप्रिया पटेल यांनी म्हटलं की, भदोहीतील काही मुलं आहेत. हे असतं मजबूत सरकार आणि हे सरकार तुम्ही बनवलं आहे. तुम्ही इथं कोणत्या उमेदवाराला मत द्यायला जात नाही आहात. उमेदवाराला विसरून जा असेही त्यांनी म्हटले. देशाच्या विकासासाठी, मजबुतीसाठी आणि उत्तर प्रदेशच्या आनंदासाठी तुम्ही मत द्यायला जाणार आहात. २०१४, २०१७ आणि २०१९ मध्ये जसा विश्वास दाखवलात तसा आताही दाखवा असं म्हणत अनुप्रिया पटेल यांनी मतदारांना आवाहन केलं.
भाजपचे उमेदवार रविंद्र नाथ त्रिपाठी यांच्या प्रचारासाठी अनुप्रिया पटेल भदोहीत गेल्या होत्या. तेव्हा केंद्रीय मंत्री अनुप्रिया यांनी म्हटलं की, मोदी सरकारने खूप काही केलं आहे. युक्रेन-रशिया लढाईमुळे जगभरात हाहाकार उडाला आहे. तिथे मोठ्या प्रमाणावर बॉम्ब हल्ले सुरु आहेत. चारही बाजुला आगीचे लोळ उठताना दिसत आहे. मात्र अशाही परिस्थितीत मोदी सरकार भारतीयांना सुखरूप मायदेशी आणत आहे.
तुम्ही याआधी भक्कम असं सरकारं दिलं आहे तर लक्षात ठेवा या निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला मत देण्यासाठी जात नाही आहात. उमेदवाराला विसरा, एनडीएच्या सरकारने तुमचं आयुष्य बदलण्यासाठी प्रत्येक गोष्ट केलीय. आमच्याकडे अनेक मोठ्या योजना आहेत. आम्ही उत्तर प्रदेशला नव्या युगात आणू असंही केंद्रीय मंत्री अनुप्रिया यांनी म्हटलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.