APJ Abdul Kalam Punyatithi esakal
देश

APJ Abdul Kalam Punyatithi : 'साधी राहणी अन् उच्च विचारसरणी'; मिसाईल मॅनचे हे किस्से तुम्हाला माहितीयेत का?

शिलाँगमध्ये विद्यार्थ्यांसमोर व्याख्यान देत असताना २७ जुलै २०१५ मध्ये कलाम यांचे निधन झाले.

धनश्री भावसार-बगाडे

Former President Dr. APJ Abdul Kalam Death Anniversary :

भारताचे लोकप्रिय दिवंगत राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची दि. २७ जुलै रोजी पुण्यतिथी असते. त्यांना देशाचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते. त्यांना लोकांचे राष्ट्रपती म्हणूनही ओळखलं जात होतं.

त्यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ ला तामिळनाडूच्या रामेश्वर इथे झाला. तर मृत्यू २७ जुलै २०१५ ला आयआयएम शिलाँग इथे विद्यार्थ्यांसमोर व्याख्यान देताना झाला. आयुष्यात अनेक यशाची शिखरे गाठलेले कलामांचे विचार जेवढे थोर होते तेवढेच त्यांचे राहणीमान साधे होते. त्यांच्या साधेपणाचे आणि थोर विचारांचे अनेक किस्से आहेत. त्यापैकी काही जाणून घेऊया.

APJ Abdul Kalam Punyatithi

कलाम यांना पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न असे देशातील सर्वोच्च पुरस्कार मिळाले होते. त्यांनी मद्रास तंत्रज्ञान संस्थेतून हवाई क्षेत्रातील एरोनॉटिकल इंजिनीयरींगची पदवी घेतल्यावर डीआरडीओमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी भारतीय लष्करासाठी हॅलिकॉप्टरचे डिझाईन तयार केले.

त्यांनी पीएसएलव्ही आणि एसएलव्ही-३ या प्रकल्पांवर काम सुरू केले. हे दोन्ही प्रोजेक्ट्स यशस्वी झाले. पोखरण अणूस्फोट चाचणीत त्यांचे महत्वाचे योगदान होते. त्यानंतर देशातील आघाडीचे अणवस्त्र शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जाऊ लागले.

APJ Abdul Kalam Punyatithi

ते देशाच्या पंतप्रधानांचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार म्हणून १९९२ ते १९९९ या कालावधीत कार्यरत होते. ते देशाचे ११ वे राष्ट्रपती होते. अग्नि आणि पृथ्वी या दोन क्षेपणास्त्र निर्मितीच्या तंत्रज्ञानामध्ये त्यांचे महत्वाचे योगदान होते.

डॉ. कलाम राष्ट्रपती झाल्यावरही त्यांनी आपल्या पदाचा कोणत्याही वैयक्तीक कामासाठी वापर केला नाही. याविषयीचेही किस्से बऱ्याच लोकांना माहित नसतील.

डॉ. कलाम यांच्या साधेपणाचे किस्से

  • राष्ट्रपती पद शपथ ग्रहण विधीसाठी कुटुंबियांना विमानाचे तिकीट न करता सेकंड एसीचे तिकीट काढून त्यांनी आणले.

  • एकदा एका दीक्षांत समारंभात राष्ट्रपती डॉ कलाम यांच्यासाठी इतरांपेक्षा वेगळी, मोठी खुर्ची ठेवण्यात आली होती. त्यांनी त्या खूर्चीवर बसण्यास नकार देत साध्या खूर्चीवरच बसले.

  • इमारतीला डिझाइन म्हणून फुटलेली काच बसवण्याचा सल्ला देण्यात आला होता. पण कलाम यांनी त्या गोष्टीला नकार दिला. यामुळे पक्षांना इजा होऊ शकते, असे त्यांचे म्हणणे होते.

  • एकदा ४०० विद्यार्थ्यांसमोर बोलताना अचानक वीज गेली. मात्र आपल्या चर्चेत, भाषणात बाधा न येऊ देता त्यांनी विद्यार्थ्यांच्या रांगेत फेऱ्या मारत आपली चर्चा पूर्ण केली.

  • राष्ट्रपती बनल्यावर केरळच्या राजभवनात सर्वात पहिले निमंत्रीत पाहुणे म्हणून त्यांनी रस्त्यावर चप्पल शिवण्याचे काम करणारा आणि एका छोट्या रेस्टॉरंटच्या मालकाला निमंत्रीत केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : राहुल गांधी आणि नाना पटोले प्रचाराचा नारळ फोडणार

SCROLL FOR NEXT