देश

अनाथ आणि मजुरांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी सैन्याचे उपक्रम

देशाच्या संरक्षणाबरोबर सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडण्यातही भारतीय लष्कर पुढे असल्याची प्रचिती पुन्हा एकदा मंजुश्री विद्यापीठ अनाथाश्रम आणि विद्याश्री स्कूलच्या माध्यमातून आली आहे.

अक्षता पवार

देशाच्या संरक्षणाबरोबर सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडण्यातही भारतीय लष्कर पुढे असल्याची प्रचिती पुन्हा एकदा मंजुश्री विद्यापीठ अनाथाश्रम आणि विद्याश्री स्कूलच्या माध्यमातून आली आहे.

तवांग (अरुणाचल प्रदेश) - देशाच्या संरक्षणाबरोबर सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडण्यातही भारतीय लष्कर पुढे असल्याची प्रचिती पुन्हा एकदा मंजुश्री विद्यापीठ अनाथाश्रम आणि विद्याश्री स्कूलच्या माध्यमातून आली आहे. मजुरांचे मुले व अनाथांना शिक्षणापासून त्यांची राहण्या खाण्याची सोय करेपर्यंत तरुणांना लष्करात दाखल होण्यासाठी योग्य मार्गदर्शन करणे, असे अनेक उपक्रम लष्करातर्फे केले जात आहेत. तवांग येथील मंजुश्री विद्यापीठ अनाथाश्रम आणि विद्याश्री स्कूलच्या माध्यमातून हे कार्य होत आहे. लष्कराच्या विशाल हृदयाची जाणीव करवून देणारी ही कामे प्रत्यक्ष पाहून समजली.

अरुणाचलमध्ये उद्योग, कंपनी, आयटी असे कोणतेही क्षेत्र नाही. तसेच येथे शाळा आणि महाविद्यालयांची संख्या कमी असून शिक्षणासाठी बऱ्याचदा विद्यार्थ्यांना दुसऱ्या राज्यात जावे लागते. त्यात विविध प्रकारच्या सुविधा पुरविण्यासाठी लष्कर सामान्य नागरिकांच्या मदतीस धावून येतात. हे अरुणाचलमधील वास्तविक चित्र आहे. सैन्यदल मंजुश्री संस्था आणि विद्याश्री स्कूलच्या सहकार्याने हे स्तुत्य प्रयत्न करत आहे. नागरिकांचे रक्षण करणे हे सैनिकाचे धर्म आहे. त्याचबरोबर त्यांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्याची जबाबदारी लष्कराची आहे. इतर राज्यांच्या तुलनेत येथे परिस्थिती वेगळी आहे. रोजगाराचे केवळ ठराविक पर्याय असल्याने अनेकांना अडचणी येतात. त्यामुळे या परिस्थितीत तरुणांना चुकीचा मार्गावर जाण्यापासून रोखणे हे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणून स्थानिकांसाठी लष्कर विविध उपक्रम राबवत आहे. असे केल्यास त्यांच्या मनात ही आपल्या प्रती विश्वासाची भावना निर्माण होते. मुलांना चांगले शिक्षण आणि मार्गदर्शन देत देशाचे भविष्य साकारण्याचा हा प्रयत्न आहे. शैक्षणिक उपक्रमाबरोबर त्यांच्या आरोग्याची ही विशेष काळजी घेतली जाते. यासाठी लष्करातर्फे वेळोवेळी आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जातात. तसेच औषध पुरवठा व इतर गरजा पूर्ण केल्या जातात. असे येथील लष्करीअधिकाऱ्यांनी सांगितले.

काय आहे ‘मंजुश्री’ -

मंजुश्री विद्यापीठ अनाथ आश्रमाची स्थापना फुन्स्टोक लामा यांनी १९९८ मध्ये केली होती. राज्यातील अनाथ, निराधार आणि दिव्यांग मुलांना मूलभूत गरजा आणि चांगले शिक्षण प्रदान करण्यासाठी याची सुरवात झाली होती. पाच माउंटन डिव्हिजनचे मेजर जनरल आर के झा यांनी सुरवातीला संस्थेतील दोन मुलांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी उचलली. त्यानंतर विविध नागरी संस्था आणि लोकांनी ही पुढाकार घेतला. या संस्थेत अरुणाचलच्या विविध भागातून २७५ मुलांची काळजी घेण्यात येत आहे. संस्थेत मुलांना ८ वी पर्यंतचे शिक्षण दिले जाते. तसेच ९ ते १० वी ची मुले बॉम्बा उच्च माध्यमिक विद्यालयात शिकत आहेत. अकरावी आणि बारावीचे शिक्षण शासकीय उच्च माध्यमिक विद्यालय, तवांगमधून पूर्ण केले जाते. सैनिकी शाळेत प्रवेशाचे प्रशिक्षण दिले जाते. संस्थेतील १७ मुलांनी सैनिकी शाळेत प्रवेश ही मिळवला. त्याचबरोबर सशस्त्र दलांमध्ये विविध प्रवेशासाठी त्यांना तयार केले जाते.

‘विद्याश्री शाळा’ -

गरजू मुलांना प्राथमिक शिक्षण मिळावे यासाठी लष्कराने ' बॉल ऑफ फायर डिव्हिजन ' प्रकल्पांतर्गत विद्याश्री शाळेची स्थापना सप्टेंबर २००६ मध्ये केली. सीमा रस्ता संघटनेच्या विविध प्रकल्पांमध्ये काम करणारे मजूर, दैनंदिन मजुरी करणारे, दगड तोडणारे, झोपडपट्टीत राहणारे, विशेषतः तवांग शहराच्या मराठा ग्राउंड या वरच्या भागापर्यंतच्या मुलांपर्यंत शिक्षण सुविधा पोहचावी हा या मागचा उद्देश होता. जिल्हा प्रशासनासह बीआरटीएफ आणि एनएचपीसी देखील यामध्ये सहभागी झाली आहे. सध्या या शाळेत बालवाडी ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग आहेत. सध्या १९ मुळे वेगवेगळ्या वर्गात शिक्षण घेत आहेत. सर्व शिक्षा अभियानांतर्गत पुस्तके आणि गणवेशाचे वाटप, मुलांसाठी दररोज माध्यान्ह भोजन, आरोग्य तपासणी शिबिरे अशा सगळ्या सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. चुजे येथील ३३७ फील्ड रेजिमेंट (आर्टीलरी) तर्फे संस्थेची देखभाल केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT