Encounter in Rajouri Update: जम्मू विभागातील राजौरी जिल्ह्यातील बाजीमल येथे आज (गुरुवार) दुसऱ्या दिवशीही चकमक झाली. या कारवाईत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येथे दोन दहशतवादी मारले गेले आहेत. त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळाही जप्त करण्यात आला आहे. अजून शोध मोहीम देखील सुरू आहे.
रात्रभर थांबल्यानंतर सुरक्षा दलांनी सकाळी पुन्हा चकमक सुरू केली, ज्यामध्ये पाकिस्तानी दहशतवादी मारला गेला. कारी नावाने एका दहशतवाद्याची ओळख पटली आहे. तो लष्कर-ए-तैयबाच्या प्रमुख दहशतवाद्यांपैकी एक होता. राजौरीतील कालाकोट जंगलात सुरू असलेल्या चकमकीत दोन अधिकाऱ्यांसह चार जवान शहीद झाले आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाची नवी लाट निर्माण करण्यासाठी पाकिस्तानस्थित दहशतवादी कारी पाठवण्यात आले होते. आयईडी बनवण्यात माहीर होता. याशिवाय तो बराच काळ गुहांमध्ये लपून दहशतवादी कारवाया करण्यात पटाईत होता, अशी माहिती मिळत आहे.
पीआरओ डिफेन्सने दिलेल्या माहितीनुसार, गोळीबारात पाकिस्तानी दहशतवादी कोरी मारला गेला आहे. त्याला पाक आणि अफगाणिस्तानमध्ये प्रशिक्षण देण्यात आले होते. कोरी हा लष्कर-ए-तैयबाचा उच्चपदस्थ दहशतवादी कमांडर होता. गेल्या एक वर्षापासून तो राजौरी आणि पूंछमध्ये त्याच्या ग्रुपसोबत सक्रिय होता. तसेच तो धनगरी आणि कंदी हल्ल्याचा मास्टरमाईंडही मानला जातो. (Latest Marathi News)
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद पुनरुज्जीवित करण्यासाठी या दहशतवाद्यांना पाठवण्यात आले होते. त्याला आयईडी पेरणे, गुहांमधून हल्ले करणे आणि प्रशिक्षित स्निपर बनण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.