army to conduct trials of ai enabled unmanned all terrain vehicles in ladakh next month  
देश

भारतीय लष्कर लडाखमध्ये घेणार AI वर चालणाऱ्या मानवरहित वाहनांची चाचणी

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : भारतीय लष्कर लवकरच लडाखमध्ये पाळत ठेवण्यासाठी आणि लॉजिस्टिक ऑपरेशन्ससाठी स्वदेशी बनवटीचे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सक्षम, मानवरहित सर्व प्रकारच्या भूप्रदेशात उपयोगी ठरणाऱ्या वाहनांच्या चाचण्या घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. लष्कराकडून या वाहनांची निवड केल्यानंतर आणि मोठ्या प्रमाणावर यांचे अधिग्रहन करण्यापूर्वी, त्यांच्या राजस्थानमधील वाळवंटात देखील चाचण्या घेतल्या जाणार आहेत.

दरम्यान यासाठी विचारात घेतलेल्या वाहनांपैकी एक कल्याणी ग्रुपने विकसित केले आहे जे बॅटरी आणि मोटर (इंधन) दोन्हीवर चालते. हे वाहन 75 उत्पादनांपैकी एक आहे, जे दिल्लीतील संरक्षण मंत्रालयाच्या पहिल्या एआय परिसंवादात प्रदर्शित करण्यात आले होते. हे वाहन बॅटरीवर सुमारे 6 तास आणि मोटरवर 14 तास काम करू शकते. त्याची ऑपरेशन रेंज ही तीन किलोमीटर असून हे वाहन तब्बल 500 ​​किलोपर्यंत भार वाहू शकते. याशिवाय दिवसा आणि रात्री काम करण्यासाठी सक्षम आहे. तसेच दोन किलोमीटर रेंज असलेले कॅमेरे या वाहनावर बसवले आहेत. या वाहनाच्या मदतीने पाच किलोमीटर अंतरापर्यंत कमांड सेंटरमधून पाळत ठेवता येते.

संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या वाहनाच्या पायदळ आणि आर्मर्ड युनिट्ससोबत दोन चाचण्या झाल्या आहेत. पायदळांने या वाहनाचा उपयोग शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा यांसारखी रसद वाहून नेण्यासाठी केला, तर आर्मड युनिट्सने शत्रूच्या ठिकाणांचा मागोवा घेण्यासाठी हे वाहन वापरले. यामध्ये दोन्ही व्हील व्हेरियंट 4×4 आणि 6×6 हे पूर्णपणे स्वदेशी डिझाइन आणि विकसित केले आहेत, तर ट्रॅक व्हर्जन हे युरोपियन कंपनीसोबत मिळून बनवले जात आहे.

वाहनामध्ये मॅपिंग, रस्ता निवडणे आणि अडथळे शोधण्यासाठी अनेक सेन्सर्स देण्यात आले आहेत आणि ते -20 अंश ते +50 अंश तापमानात देखील काम करू शकतात. या वर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या भारत-जपान लष्करी सरावाचाही हे वाहन भाग होते. मानवरहित वाहन स्फोटक शोधण्यासाठी आणि सुधारित स्फोटक उपकरणे (IEDs) निष्क्रिय करण्यासाठी देखील वापरण्यात येईल. सूत्रांनी सांगितले की, हे वाहन पुढील महिन्यात लडाखसारख्या उंच प्रदेशात चाचण्यांसाठी पाठवले जाईल आणि नंतर या वाहनाच्या वाळवंटात देखील चाचण्या घेण्यात येतील.

लष्कराकडून याच प्रकारच्या आणखी वाहनांचा विचार केला जात असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे, टोरस रोबोटिक्सने एक वाहन विकसीत केले आहे, त्याची पेलोड क्षमता 750 किलो आहे आणि ती सरकारी BEML Ltd सह मिळून विकसित केली गेली आहे.

सूत्रांनी सांगितले की, लष्कर हे एआय आणि मानवरहित सिस्टीम व्यापक समावेशावर विचार करत आहे. त्रिशूल, AI-सक्षम आणि रिमोटली ऑपरेटेड शस्त्रास्त्र स्टेशन जे मानवी हालचाली, शस्त्रे आणि आग यांची आपोआप ओळख करेल. हे विकसीत केलेले वाहन 300 मीटरवरील लक्ष्य गाठण्यासाठी 100 टक्के संभाव्यतेसह सक्षम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT