Mucormycosis Esakal
देश

कोरोनासोबत म्युकरमायकोसिस संकट; 26 राज्यात संसर्ग

नामदेव कुंभार

भारतामध्ये कोरोना महमारीची दुसरी लाट (Coronavirus 2nd Wave) हळू-हळू आटोक्यात येत आहे. पण धोका अद्याप कायम आहे. कोरोना महामारीच्या या संकटाबरोबरच देशावर म्युकरमायकोसिस महामारीचं संकटही आलं आहे. कोरोनामुळे आधीच बेजार झालेल्या नागरिकांसमोर म्युकरमायकोसिसचं संकट आलं आहे. म्युकरमायकोसिसचा संसर्ग देशामध्ये वेगानं होत आहे. (around 20000 people infected with mucormycosis in 26 states)

26 राज्यात म्युकरमायकोसिस -

म्युकरमायकोसिसचा 26 राज्यात संसर्ग झाला आहे. अनेक राज्यांनी याला महामारी जाहीर केलं आहे. सध्या 26 राज्यात 20 हजारपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आयसीएमआर (ICMR) ने दिलेल्या माहितीनुसार, डायबिटीज असणाऱ्या रुग्णांना म्युकरमायकोसिसचा सर्वाधिक जास्त धोका आहे.

म्युकरमायकोसिसच्या इंजिक्शनचा तुटवडा -

Mucormycosis (काळी बुरशी) आजार चिंता वाढवणारा आहे. या आजारावर बुरशीविरोधी औषधं Amphotericin B प्रभावी ठरत असून देशभरात तुटवडा आहे. एकूण मागणीच्या 10 टक्के इंजिक्शन्सही उपलब्ध नाहीत. केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी सोमवारी सांगितलं की, Amphotericin B या औषधांच्या अतिरिक्त 30100 बाटल्या राज्यांना पाठवल्या आहेत.

कोणत्या राज्यांना अतिरिक्त Amphotericin B चा पुरवठा?

सदानंद गौडा यांनी ट्विट करत सांगितलं की, सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना Amphotericin B या औषधांच्या अतिरिक्त 30,100 बाटल्या दिल्या आहेत. यामध्ये महाराष्टाला सर्वाधिक 5900 बाटल्या दिल्या आहेत. तर गुजरातला 5630 बाटल्या उपलब्ध करुन दिल्या आहेतय. याशिवाय आंध्र प्रदेश1600, मध्य प्रदेश 1920, तेलंगाना 1200, उत्तर प्रदेश 1710, राजस्थान 3670, कर्नाटक 1930 आणि हरियाणा 1200 यांना Amphotericin B च्या बाटल्या उपलब्ध करुन दिल्या आहेत.

असा पसरतो म्युकोरमायकोसिस

श्वासोच्छवास आणि त्वचेच्या माध्यमातून रोगजंतू शरीरात प्रवेश करतात. वेगवेगळ्या अवयवांचे ते नुकसान करतात. ‘म्युकोरमायकोसिस’ मेंदू, नाक, सायनस म्हणजेच हवेच्या पोकळ्यांमध्ये वाढते. सुरवातीला हे लक्षात येत नाही. मात्र चेहरा नाक डोळ्याला हळू हळू सूज येताच या ‘फंगल इन्फेक्शन’चे तात्काळ निदान करून उपचार करणे गरजेचे आहे.

हे आहेत उपचार

1. डोळे, गाल आणि अनुनासिक अडथळा किंवा काळ्या कोरड्या कवचाची सूज आल्यावर ‘अँटीफंगल’ औषधी त्वरित सुरू करावी.

2. ‘अँटी फंगल’ औषोधपचार आणि शस्त्रक्रियेद्वारे वेळीच उपचार झाल्यास कान, नाक, डोळे वाचवण्यात डॉक्टरांना यश येऊ शकते.

3. काही रुग्णांत पुढच्या टप्प्यातील या ‘इन्फेक्शन’ मुळे हाडांची झीज झाल्याने व ‘इन्फेक्शन’ नजीकच्या भागात, मेंदू पर्यंत पसरू नये यासाठी शस्त्रक्रिया करून झीज झालेले हाड काढावे लागते त्यात लगतचा अवयव गमवावा लागतो.

4. कोविडपासून मुक्त झाल्यानंतर नियमित व्यायाम, मधुमेहावर नियंत्रण मिळविण्यासाठी योग्य औषोधपचार, सोबत सकस आहार घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT