Accident News 
देश

भारतात 2020 मध्ये 2.5 लाखांहून अधिक रस्ते अपघात; मृतांचा आकडा थक्क करणारा

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : रस्त्यावरील बहुतांश अपघात हे अतिवेगाने वाहन चालवल्यामुळे होतात. याशिवाय चुकीच्या दिशेने गाडी चालवणे आणि मद्यपान करणे, मोबाईल फोनवर बोलणे आणि सिग्नल न पाळणे ही देखील महत्त्वाची कारणे आहेत. रस्ते वाहतूक मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालातून ही माहिती मिळाली आहे.

रस्त्यांवरील मृत्यूंपैकी ६९.३ टक्के मृत्यू हे वेगामुळे झाले आहेत. 'भारतातील रस्ते अपघात - 2020' शीर्षकाच्या या अहवालानुसार, चारचाकी वाहनांत 2020 मध्ये 11 टक्क्यांहून अधिक मृत्यू आणि दुखापती सीट बेल्ट न लावल्यामुळे झाल्या. तर 30.1 टक्के मृत्यू आणि 26 टक्के जखमी हेल्मेट न घातल्यामुळे झाले. 2020 मध्ये सीट बेल्ट न लावल्यामुळे 15,146 लोकांचा मृत्यू झाला आणि 39,102 जण जखमी झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

2020 मध्ये, भारतात वेगामुळे एकूण 2,65,343 रस्ते अपघात झाले, ज्यामध्ये 91,239 लोकांचा मृत्यू झाला. चुकीच्या दिशेने वाहन चालवल्यामुळे २०,२२८ रस्ते अपघात झाले आणि या अपघातांमध्ये ७,३३२ जणांना आपला जीव गमवावा लागला. या अहवालानुसार, दारू पिऊन गाडी चालविल्यामुळे 8,355 रस्ते अपघात झाले, त्यात 3,322 लोकांचा मृत्यू झाला. त्याच वेळी, वाहन चालवताना फोनवर बोलल्यामुळे 6,753 रस्ते अपघात झाले ज्यात 2,917 लोक मरण पावले.

मोटार वाहन दुरुस्ती कायदा (MVA) 2019 च्या अंमलबजावणीमुळे रस्ते अपघात कमी होण्यास मदत झाल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. हा कायदा 1 सप्टेंबर 2019 रोजी लागू झाला. या कायद्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन, इलेक्ट्रॉनिक पाळत ठेवणे, अल्पवयीन मुलांकडून वाहन चालवल्याबद्दल दंडात मोठी वाढ अशा तरतुदींचा समावेश करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हृदयद्रावक ! पिकनिकला निघालेल्या शाळेच्या बसने अचानक घेतला पेट, २५ मुलांचा होरपळून मृत्यू झाल्याची भीती

iPhone मागवला, पैसे देण्याऐवजी डिलिव्हरी बॉयचा केला खून; मृतदेहाची 'अशी' लावली विल्हेवाट

WTC 2023-25 Points Table: टीम इंडियाने सिंहासन केलं भक्कम, पण आता आव्हान न्यूझीलंड-ऑस्ट्रेलियाचे

Suyash Tilak: "पैसे न देणाऱ्यांचं..." मराठी अभिनेत्याला मिळाले नाहीत कामाचे पैसे; पोस्ट करत व्यक्त केला संताप

Latest Maharashtra News Updates : यशवंत सहकारी साखर कारखान्याची ११७ एकर जमीन विक्रीला

SCROLL FOR NEXT