चुमी  sakal
देश

चुमी ग्यात्से'वर चीनचा डोळा

पर्यटनाला चालना देत नागरिकांना आपल्या हद्दीतील स्थळाबाबत माहिती देण्याची गरज ; लष्कराचे मत

अक्षता पवार

अरुणाचल प्रदेश : यांगत्से क्षेत्राजवळील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (एलएसी) अवघ्या २५० मीटर अंतरावर भारताच्या हद्दीत असलेल्या 'होली वॉटर फॉल' अर्थात पवित्र पाण्याच्या धबधब्यावर ही चीन आपला हक्क असल्याचा दावा करत आहे. मात्र या स्थळावर भारतीय सैन्याने आपली पकड मजबूत करत चीनला यावर नियंत्रण मिळविण्यापासून रोखले आहे. महत्त्वाचे म्हणजेच अरुणाचलमधील हे असे ठिकाण आहे जिथे सैन्याने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.

चीनद्वारे अनेकदा एलएसीच्या परिसरातील भाग त्यांचा असल्याचा दावा केला जातो. तसेच घुसखोरी ही केली जाते. असाच एक दावा चीन सातत्याने या धबधब्यासाठी करत असून यावर ताबा मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहे. चीन आणि अरुणाचल प्रदेशच्या तिबेट स्वायत्त प्रदेशाचे सीमांकन करणाऱ्या मॅकमोहन रेषेवरील विवादित स्थळापैकी हे एक आहे. मात्र हा धबधबा भारताच्या हद्दीत असून आपल्या सीमेच्या आत येण्यापासून चीनला रोखण्याची जबाबदारी सैन्यदल पार पाडत आहे. येथे पर्यटनाला चालना दिल्याने हा भाग भारताचाच हद्दीतील आहे, हे खऱ्या अर्थाने सिद्ध होत लोकांमध्ये ही तीच मानसिकता निर्माण होईल. तसेच चीनला सुद्धा यावर हक्क गाजवता येणार नाही, असे लष्करी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

गुरु पद्मसंभव यांचा जन्म तिबेटमध्ये झाल्याचा दावा चीनद्वारे केला जात आहे. या स्थळाची माहिती मिळावी यासाठी चीन या भागावर पाळत ठेवण्यासाठी कॅमेराचा ही वापर करत असल्याचे लष्करी सूत्रांनी सांगितले.

होली वॉटरफॉलचा इतिहास :

सुमारे ११ हजार फूट उंचीवरून या धबधब्याचे उगम असलेल्या या धबधब्याला पवित्र स्थळ मानले जाते. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, ८ व्या शतकातील बौद्ध धर्मगुरू आणि तिबेटी बौद्ध धर्माचे जनक गुरू पद्मसंभव यांना येथे पसरलेल्या महामारीपासून स्थानिकांना वाचवण्यासाठी आपल्या जपमाळेतील (१०८ मण्यांची माळ) या शिखराच्या खडकावर फेकली. यामुळे येथे १०८ झरे तयार झाले. या झऱ्यांचे एकत्रितपणे 'चुमी ग्यात्से' (पवित्र पाणी) धबधबा तयार झाला. अनेक भाविक या ठिकाणी येतात व छोटे छोटे लामा ध्वज बांधत प्रार्थना करतात.

इन्फोबॉक्स:

होली वॉटर फॉल बाबत मोठ्या प्रमाणात लोकांना माहिती नाही. तसेच रस्त्याची खराब अवस्था आणि संपर्क व इंटरनेट उपलब्ध नसल्याने अनेक वेळा या स्थळाला भेट देण्यास पर्यटक टाळतात. त्यामुळे या सुविधा निर्माण करण्यावर भर देण्याची गरज असून यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटनाला चालना मिळेल. परिणामी हे आपल्या हद्दीतील स्थळ असल्याची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचेल. तसेच अधिकृतरित्या भारताचे या स्थळावर वर्चस्व कायम राहील.

एलएसीच्या जवळ हे स्थळ असल्याने येथे लष्कराच्या तुकड्या तैनात आहेत. मात्र पर्यटकांना भेट देण्यासाठी येथे बंधन नसून त्यांच्या सुरक्षिततेची काळजी देखील घेतली जात आहे. असे लष्कराकडून सांगण्यात आले.

लष्कराचे प्रयत्न :

  • - समाज माध्यमाद्वारे या धबधब्याबाबत माहिती पोहचविणे

  • - हॅशटॅग होली वॉटर फॉल (#holywaterfall) उपक्रम

  • - पर्यटनासाठी सर्व प्रकारे सहाय्य करणे

  • - धबधब्याला भेट देणाऱ्यांच्या सुरक्षिततेची घेतली जाते काळजी

  • - या स्थळाला भारतीय हद्दीतील स्थळ म्हणून ओळख निर्माण करण्याचे प्रयत्न

  • - आपल्या हद्दीतील पर्यटन स्थळ म्हणून पर्यटकांची संख्या येथे वाढल्यास चीनला माघार घेणे हाच पर्याय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

Vaijapur Assembly Election 2024 Result Live: वैजापुरात शिवसेना विरुद्ध शिवसेना लढतीत रमेश बोरनारे यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Gangapur Assembly Election 2024 Result Live: भाजपचे प्रशांत बंब विजयी, सतिश चव्हाणांवर केली मात

Tanaji Sawant won Paranda Assembly Election 2024 : परांडा मतदारसंघात तिरंगी लढाईत तानाजी सावंत तानाजी सावंत यांनी मारली बाजी

SCROLL FOR NEXT