Arvind Kejriwal caught in BJPs innings Why is it difficult to turn your back on Murmu Arvind Kejriwal caught in BJPs innings Why is it difficult to turn your back on Murmu
देश

भाजपच्या डावात फसले अरविंद केजरीवाल? मुर्मूपासून पाठ फिरवणे का अवघड!

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी (president election) आदिवासी नेत्या द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. तर विरोधी पक्षांनी भाजपचे (Bjp) माजी नेते यशवंत सिन्हा यांचे नाव घोषित केले आहे. एकीकडे उमेदवार जाहीर झाल्यानंतर सत्ता आणि विरोधकांनी आपापली गणिते बळकट करण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे असे काही पक्ष आहेत ज्यांनी एनडीएच्या उमेदवाराला मत द्यायचे की विरोधी पक्षाला याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. (Arvind Kejriwal caught in BJPs innings Why is it difficult to turn your back on Murmu)

पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी पक्षाचा राष्ट्रीय विस्तार करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. भाजपविरुद्धच्या (Bjp) लढाईत पक्ष स्वतःला काँग्रेसचा पर्याय म्हणून दाखवत आहे. अशा स्थितीत पक्ष विरोधी उमेदवाराला पाठिंबा देईल, असे मानले जात होते.

मात्र, भाजपच्या आदिवासी खेळीने आपची कोंडी केली आहे. अलीकडच्या काळात बाबासाहेब भीमराव आंबेडकरांचे अनुयायी म्हणून स्वत:ला प्रक्षेपित करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना द्रौपदी मुर्मूकडे पाठ फिरवणे सोपे जाणार नाही.

गुजरात निवडणुकीमुळे राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार (president election) द्रोपती मुर्मू यांना पाठिंबा न देणे आपसाठी अवघड आहे. मोठ्या प्रमाणात आदिवासी लोकसंख्या असलेल्या गुजरात विधानसभेत पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. राज्यात सुमारे ९० लाख आदिवासी आहे. १४ जिल्ह्यांतील निवडणुकीतील पराभव आणि विजय निश्चित करण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची आहे.

खासदारांची संख्या तीनवरून आठवर

राजकीय तज्ज्ञांच्या मते केजरीवाल विरोधी छावणीसोबत गेल्यास भगवा पक्ष त्यांना आदिवासी विरोधी म्हणून दाखवेल आणि ते आपला परवडणार नाही. पंजाबमध्ये पक्षाच्या विजयानंतर आपच्या राज्यसभेतील खासदारांची संख्या तीनवरून आठवर पोहोचली आहे. पुढील महिन्यात पंजाबचे दोन राज्यसभा खासदार निवृत्त झाल्यानंतर पक्षाकडे दहा खासदार असतील.

अंतिम निर्णय पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व घेईल

उमेदवारांच्या नावांच्या घोषणेची वाट पाहणाऱ्या पक्षाने आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी कोणताही निर्णय घेतला नसल्याचे सांगितले आहे. पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत निर्णय घेईल तेव्हा मी ते तुमच्याशी शेअर करेन. अंतिम निर्णय पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व घेईल, असे विरोधकांनी सिन्हा यांच्या नावाच्या घोषणेवर आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khanapur Assembly Election 2024 Results : सुहास बाबर यांना विक्रमी 27 हजाराचे मताधिक्य; तानाजीराव पाटील ठरले किंगमेकर!

Wani Assembly Election Results 2024 : वणी मतदारसंघात शिवसेनेची मशाल पेटली! संजय देरकरांचा दणक्यात विजय

Raju Navghare Won Wasmat Assembly Election 2024 Result : दुरंगी लढतीत राजू नवघरे विजयी; जयप्रकाश दांडेगावकर यांचा पराभव

Aurangabad West Assembly Election 2024 Result Live: शिवसेना विरुद्ध शिवसेना लढतीत संजय शिरसाटांनी राखला गड

Mahesh Choughule Won in Bhiwandi West Assembly Election : भिवंडी पश्चिम मतदार संघावर तिसऱ्यांदा भाजपचा झेंडा; महेश चौघुलेंची बाजी

SCROLL FOR NEXT