Arvind Kejriwal Bail Petetion
Arvind Kejriwal Bail Petetion Esakal
देश

Arvind Kejriwal : ''अरविंद केजरीवालांची कोठडी आम्हाला नकोय..'', CBIने कोर्टात मांडलं म्हणणं; त्यावर न्यायाधीश म्हणाले...

संतोष कानडे

AAP Leader Arvind Kejriwal : दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यात जेलमध्ये असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआय अधिकाऱ्यांनी शनिवारी राऊज अवेन्यू कोर्टात नेलं. यावेळी सीबीआयने केजरीवालांसाठी रिमांड मागितलं नाही. केजरीवालांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याची मागणी सीबीआयने केली आहे.

राऊज अवेन्यू कोर्टाने अरविंद केजरीवालांना तीन दिवसांच्या सीबीआय कोठडीत पाठवलं होतं. शनिवारी ही कोठडी संपल्यानंतर सीबीआयने केजरीवालांना कोर्टासमोर सादर केलं. शनिवार असल्यामुळे केजरीवालांची पेशी ड्यूटी मॅजिस्ट्रेट यांच्यासमोर झाली.

यावेळी अरविंद केजरीवालांच्या वकिलांनी म्हटलं की, आम्हाल न्यायालयीन कोठडीच्या विरोधात अर्ज दाखल करायचा आहे. त्यामुळे आम्हाला थोडा वेळ द्या, अशी बाजू त्यांनी मांडली.

केजरीवालांचे वकील विक्रम चौधरी पुढे म्हणाले, ही अशी केस आहे ज्यात २०२२ पासून तपास सुरु आहे. ईडीने २१ मार्च रोजी अटक केली होती. ज्यात सुप्रीम कोर्टाने तीन आठवड्यांचा अंतरिम जामीन दिला होता.

कोर्टाने म्हटलं की, तुम्ही अर्ज का दाखल करु इच्छिता? जर तुम्हाला जामीन पाहिजे तर तुम्ही संबंधित कोर्टासमोर जामीन अर्ज करा. पोलिस कोठडी संपल्यानंतर कोर्टाकडे सीआरपीसीनुसार आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठण्याशिवाय काहीही पर्याय नाही.

''सीबीआयने ३ जुलैपर्यंत तपास पूण करण्याचं सांगितलं आहे. त्यानंतर तुम्हाला जामिनासाठी अर्ज दाखल करता येईल. त्यामुळे तुम्हाला न्यायालयीन कोठडी नको, असं म्हणता येणार नाही'' असं स्पष्ट करत कोर्टाने केजरीवालांच्या वकिलांना फटकारलं आणि केजरीवालांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lal Krishna Advani: लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती बिघडली! खासगी रुग्णालयात उपचार सुरु

Sudha Murty: सुधा मूर्तींनी खासदार म्हणून पहिल्यांदाच केलं राज्यसभेत भाषण; सर्वत्र होतंय कौतुक

Babar Azam : आधी आर्मी ट्रेनिंग आता गादीवर डाईव्हची प्रॅक्टिस... पाकिस्तान संघाचा अजब सराव

Hemant Soren: तुरुंगातून बाहेर आल्यानंतर हेमंत सोरेन पुन्हा होणार मुख्यमंत्री; चंपई सोरेन यांनी दिला राजीनामा

Hardik Pandya : आता कोणी हार्दिकला ट्रोल करून दाखवाच.... भारताच्या माजी क्रिकेटपटूनं भारला सज्जड दम

SCROLL FOR NEXT