'भाजपच्या गुंडांनी केजरीवाल यांच्या घराची तोडफोड केलीय.'
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या घरावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी काल ट्विट करून ही माहिती दिली. काही समाजकंटकांनी केजरीवाल यांच्या घरावर हल्ला केला. हल्लेखोरांनी सीसीटीव्ही कॅमेरे आणि सेक्युरिटी बॅरिअर तोडले. तसेच घराच्या गेटवरील बूम बॅरिअरही तोडले आहेत. त्यामुळं एकच खळबळ उडाली होती. भाजपच्या गुंडांनीच हा हल्ला केल्याचा आरोप आम आदमी पार्टीकडून करण्यात आलाय. यावर पहिल्यांदा प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री केजरीवाल यांनी या घटनेचा निषेध नोंदवलाय.
केजरीवाल म्हणाले, भाजपसारख्या (BJP) बड्या पक्षानं गुंडागर्दी केल्यास तरुणांमध्ये चुकीचा संदेश जाईल. त्यामुळं देशाचं मोठं नुकसानही होईल. केजरीवाल कदाचित महत्त्वाचे नसतीलही, पण देशासाठी माझा प्राण गेला तरी मला त्याची परवा नाहीय. आपण सगळ्यांनी मिळून आपला देश पुढं न्यायचं आहे. गेली 75 वर्षे आपण एकमेकांविरुध्द भांडणचं करत आलो आहोत, हे कुठंतरी थांबायला हवं, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
सिसोदिया यांनीही या हल्ल्याला भाजप जबाबदार असल्याचं म्हटलंय. भाजपच्या गुंडांनी केजरीवाल यांच्या घराची तोडफोड केलीय. भाजपच्या पोलिसांनी या गुंडांना रोखण्याऐवजी केजरीवालांच्या घरापर्यंत त्यांना घेऊन गेली, असा आरोप सिसोदिया यांनी केलाय. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 8 आरोपींना अटक केलीय. आता आणखी आरोपींचा शोध सुरू असल्याचं पोलिसांचं (Delhi Police) म्हणणं आहे. यासाठी 6 पथकं तैनात करण्यात आली आहेत. तर, दुसरीकडं आम आदमी पक्षानं याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतलीय. आपचे आमदार सौरभ भारद्वाज यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करून एसआयटी स्थापन करण्याची मागणी केलीय.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.