Arvind Kejriwal Latest News Esakal
देश

Arvind Kejriwal Latest News: निवडणुकीच्या तोंडावर केजरीवालांना अटक! पक्षात हाहाकार, लोकसभा निवडणुकीची जबाबदारी 'या' दिग्गजांच्या खांद्यावर

Arvind Kejriwal Latest News: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालयाने ईडीने केलेल्या अटकेवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Arvind Kejriwal Latest News: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची अटक हा आम आदमी पक्षाला सर्वात मोठा धक्का आहे. अशा स्थितीत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची जबाबदारी पक्षातील भगवंत मान, आतिशी, सौरभ भारद्वाज या बड्या चेहऱ्यांवर पडणार आहे. अशातच आपचे खासदार राघव चढ्ढा डोळ्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी ब्रिटनला गेले आहेत. अशा स्थितीत यावेळी त्यांनाही पंजाबमधील निवडणूक प्रचारात सहभागी होता येणार नाही.

राघव चढ्ढा यांनी विधानसभा निवडणुकीत पंजाबमध्ये प्रचाराची धुरा सांभाळली होती आणि पक्षाला जोरदार विजय मिळवून दिला होता. अशा परिस्थितीत पंजाबमधील 'आप'चा मोठा चेहरा बघितला तर फक्त मुख्यमंत्री भगवंत मान उरले आहेत.

मुख्यमंत्री मान यांचा भाजपवर हल्लाबोल

मद्य धोरण घोटाळा प्रकरणात ईडी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवरून पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. ईडीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ते म्हणाले की, ईडी ही भाजपची राजकीय टीम आहे. केजरीवालांच्या विचारसरणीला भाजप कैद करू शकत नाही कारण फक्त आम आदमी पार्टीच भाजपला रोखू शकते. विचार कधीही दाबता येत नाही.

उर्वरित 5 उमेदवारांची घोषणा येत्या 5 दिवसांत करणार

येत्या १५ दिवसांत राज्यातील उर्वरित ५ लोकसभेच्या जागांसाठी पक्ष उमेदवार जाहीर करेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यांनी आपल्या एक्स हँडलवरून ही माहिती दिली. 'आप'ने यापूर्वीच 8 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत.

अमृतसरचे कुलदीपसिंग धालीवाल, खादूर साहिबचे लालजीत सिंग भुल्लर, जालंधरचे सुशील कुमार रिंकू, फतेहगढ साहिबचे गुरप्रीत सिंग जीपी, फरीदकोटचे करमजीत अनमोल, भटिंडाचे गुरमीत सिंग खुडियान, संगरूरचे गुरमीत सिंग मीत हेअर आणि पटियालाचे डॉ. बलबीर यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. लुधियाना, गुरुदासपूर, आनंदपूर साहिब, फिरोजपूर आणि होशियारपूरचे उमेदवार येत्या ५ दिवसांत जाहीर केले जातील.

पक्षाने मार्च महिन्याच्या सुरुवातीला आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे.पक्षात होशियारपूर लोकसभा मतदारसंघासाठी कॅबिनेट मंत्री ब्रह्म शंकर झिम्पा आणि नुकतेच काँग्रेसमधून आलेले डॉ. राजकुमार चब्बेवाल, लुधियानाचे सरबजीत कौर मनुके आणि उद्योगपती राजेश तांगडी, आनंदपूर साहिबमधून पक्षाचे मुख्य प्रवक्ते मलविंद्र कांग आणि गुरदासपूरमधून नरिंदर सिंग शेरगिल यांचा समावेश आहे. रमण बहल आणि कॅबिनेट मंत्री लालचंद कटारुचक्क आणि फिरोजपूरमधून गोल्डी बहल आणि चरणजीत सिंग हे तिकीटाचे दावेदार मानले जात आहेत.

पंजाब आणि चंदीगडमधील 14 जागांवर आप एकट्याने निवडणूक लढवणार

पंजाब आणि चंदीगडच्या १४ जागांवर आम आदमी पक्ष एकटाच निवडणूक लढवणार आहे. पक्ष पंजाबमध्ये कोणत्याही इंडिया आघाडीशिवाय एकटा निवडणूक लढवत आहे. दिल्लीच्या धर्तीवर पंजाबमध्येही आम आदमी पक्षाने सर्वाधिक आमदार उभे केले आहेत. काँग्रेस आणि आप यांनी परस्पर सहमतीने हा निर्णय घेतला होता. मात्र, पंजाब काँग्रेसचे बडे नेते सुरुवातीपासूनच आघाडीच्या विरोधात होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT