Latest Political News Updates in Marathi: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांना पत्र लिहून पाच महत्वाचे प्रश्न विचारले आहेत. या पत्रामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीपासून इतर अनेक मुद्द्यांवर स्पष्टीकरण मागितले आहे. केजरीवाल यांनी सांगितले की, हे पत्र त्यांनी राजकीय नेता म्हणून नव्हे, तर एक सामान्य नागरिक म्हणून लिहिले आहे.
केजरीवाल यांनी पत्रात पहिला प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवृत्तीवर विचारला आहे. लालकृष्ण आडवाणी यांना 75 व्या वर्षानंतर निवृत्त केल्याच्या उदाहरणाचा उल्लेख करून, त्यांनी भागवतांना विचारले की, “आडवाणींवर लागू झालेला निवृत्तीचा नियम मोदींवर लागू होणार नाही का?”
दुसरा प्रश्न विचारताना केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केलेल्या नेत्यांवर काहीच काळानंतर भाजपसोबत सरकार बनवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. “भ्रष्टाचारी नेत्यांवर आरोप लावून काही दिवसांनंतर त्यांना भाजपमध्ये सामील करून घेणे, हे काय तुम्हाला किंवा आरएसएसला मान्य आहे?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
केजरीवाल यांनी आपल्या पत्रामध्ये भारतीय लोकशाही आणि तिरंग्याचा मान राखण्याची महत्त्वाची जबाबदारी आपली असल्याचे म्हटले आहे. “भारताचे तिरंगा गर्वाने आकाशात लहरावे, हे सुनिश्चित करणे आपल्यासारख्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे,” असे केजरीवाल म्हणाले.
तिसऱ्या मुद्द्यावर केजरीवाल यांनी भागवत यांना विचारले आहे की, “ईडी-सीबीआयचा वापर करून, सरकारे पाडणे आणि विरोधकांना दबावाखाली आणणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दृष्टिकोन आहे का?” त्यांनी म्हटले आहे की, भारतातील प्रत्येक नागरिकाच्या मनात हे प्रश्न आहेत.
केजरीवाल यांनी पुढे विचारले की, “भाजप जे पथभ्रष्ट कार्य करत आहे, त्याबाबत आपण कधीही पंतप्रधानांना रोखले का? भाजपचा मार्ग चुकीचा असल्यास आरएसएसची जबाबदारी आहे की त्यांना योग्य मार्गावर आणावे.”
अखेर, केजरीवाल यांनी आशा व्यक्त केली आहे की मोहन भागवत या पत्राला उत्तर देतील. ते म्हणाले की, “मी तुम्हाला हे पत्र सामान्य नागरिक म्हणून लिहीत आहे आणि मला आशा आहे की तुम्ही या प्रश्नांना उत्तर द्याल.”
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.