Sunita Kejriwal 
देश

Arvind Kejriwal: केजरीवालांचा तुरुंगातून संदेश! पत्नीनं वाचून दाखवला, म्हणाले, आपल्याला सतर्क...

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या तुरुंगात ईडीच्या कोठडीत आहेत. तुरुंगातून त्यांनी जनतेसाठी संदेश पाठवला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या तुरुंगात ईडीच्या कोठडीत आहेत. तुरुंगातून त्यांनी जनतेसाठी संदेश पाठवला आहे. हा संदेश त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी आज एका व्हिडिओच्या माध्यमातून वाचून दाखवला. तुमचा भाऊ, तुमचा मुलगा लोखंडासारखा मजबूत आहे, असं सांगताना आपण लवकरच तुरुंगातून बाहेर येऊ आणि समाजसेवेचे व्रत सुरुच ठेऊ असं केजरीवालांनी म्हटल्याचं म्हटलं आहे. (arvind kejriwal message from jail his wife sunita kejriwal read it through video)

अरविंद केजरीवालांचा संदेश असा की, "माझ्या प्रिय देशवासियांनो मला काल अटक करण्यात आली. मी तुरुंगात असेन किंवा बाहेर, प्रत्येक क्षणी देशाची सेवा करत राहिल. माझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण देशासाठी समर्पित आहे. माझं जीवन हे कायमचं संघर्षमय राहिलं आहे, त्यामुळं मला ही अटक मला विशेष वाटत नाही. (Marathi Tajya Batmya)

आपल्याला भारताला देशातील सर्वात शक्तीशाली राष्ट्र बनवायचं आहे. भारतात आणि भारताबाहेर अनेक शक्ती आहेत ज्या देशाला कमजोर करत आहेत. आपल्याला या शक्तींना हारवायचं आहे. मी लवकच बाहेर येईल आणि आपला वायदा पूर्ण करेन. मी जरी तुरुंगात गेलेलो असलो तरी माझी आम आदमी पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन आहे की आपलं समाज कल्याणाचं काम थांबता कामा नये. त्यासाठी भाजपच्या लोकांचा द्वेष करु नका, ते आपले भाऊ-बहिण आहेत. मी लवकरच परत येईन" (Latest Maharashtra News)

सुनीता केजरीवाल कोण आहेत?

जर केजरीवाल तुरुंगातून लवकर बाहेर येऊ शकले नाहीत तर आपमधील दुसरी व्यक्ती दिल्लीची मुख्यमंत्री होऊ शकते. यामध्ये सुनिता केजरीवाल यांचं नाव आघाडीवर आहे. सुनिता या अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी आहेत. पण त्यांची केवळ हीच ओळख नाही तर त्या माजी प्रशासकीय अधिकारी आहेत. सध्या त्या राजकारणात सक्रीय नाहीत. सुनिता या आयआरएस म्हणजे महसूल अधिकारी होत्या.

अरविंद केजरीवाल आणि सुनिता हे म्हैसूरला एकत्रच शिकायला होते. सुनिता या सन १९९३ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. सन २०१६ मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. प्राप्तीकर विभागात त्यांनी २२ वर्षे काम केलं आहे. निवृत्ती घेण्यापूर्वी त्या दिल्लीत आयकर अपिलिय न्यायाधिकरण विभागात आयकर आयुक्त म्हणून कार्यरत होत्या.

१९९५ च्या बॅचचे आयआरएस अरविंद केजरीवाल यांच्याशी त्यांची भोपाळमधील एका प्रशिक्षण कार्यक्रमात ओळख झाली. त्यानंतर त्यांनी १९९५ मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. सुनिता केजरीवाल यांचं झुलॉजी या विषयात पदव्युत्तर पदवीपर्यंतच शिक्षण झालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : लोकसभेला गंमत केली आता गंमत केली तर...; अजित पवार थेटच बोलले

Paithan Vidhan Sabha: संदीपान भुमरेंच्या मुलावर प्रचार थांबवण्याची वेळ; डॉक्टरांनी सांगितलं कारण

Latest Maharashtra News Updates live : येवल्यात मनोज जरांगेंचं जंगी स्वागत

ouchhh...! भारताला मोठा धक्का, Shubman Gill ला सराव सामन्यात दुखापत, पर्थ कसोटीला मुकण्याची शक्यता

Green Plants : हिवाळ्यात घरातील हवा राहील ताजी, या ४ हिरव्या झाडांनी हवा होईल शुद्ध

SCROLL FOR NEXT