नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना येत्या ३ ते ४ दिवसांत अटक होऊ शकते, अशी भीती दिल्लीच्या एका मंत्र्यानं व्यक्त केली आहे. केजरीवाल यांना ईडीकडून फास आवळण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण केजरीवालांनी ईडीच्या नोटिशा धुडकावून लावल्या आहेत. कारण आपण चौकशीला गेलो तर ईडी थेट अटकेची कारवाई करु शकते, असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. (Arvind Kejriwal will be arrested in next 3 to 4 days if AAP ties up with Congress in Delhi says Minister Atishi)
दिल्लीच्या शिक्षण मंत्री आणि आपच्या नेत्या आतिषी यांनी म्हटलं की, "पक्षाच्या नेत्यांना हा मेसेज आला आहे की जर आपनं दिल्लीमध्ये काँग्रेससोबत युती केली तर अरविंद केजरीवाल यांना येत्या ३ ते ४ दिवसांत अटक होऊ शकते" (Latest Marathi News)
आतिषी यांनी पुढे म्हटलं की, चंदीगड महापौर निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानं सुड उगवण्यासाठी तसेच केजरीवालांना घाबरवण्यासाठी भाजपनं ईडीच्या माध्यमातून हा प्रयत्न केला जात आहे. ईडीच्या समन्सबाबत सध्या कोर्टात सुनावणी सुरु आहे. ईडीनं स्वतः कोर्टात धाव घेतली आहे मग कोर्टाचा निकाल येईपर्यंत त्यांना धीर का धरवत नाहीए? केजरीवालांना पाठवण्यात आलेलं सातव समन्स हे बेकायदा आहे. (Marathi Tajya Batmya)
आतिषी यांच्या या माहितीमुळं केजरीवालांना अटक होण्याच्या यापूर्वीच्याच चर्चांवर शिक्कामोर्तब होत असल्याचं दिसून येत आहे. कारण दिल्लीच्या कथित अबकारी कर घोटाळ्याप्रकरणी ईडीनं दिल्लीचे मुख्यंमत्री अरविंद केजरीवाल यांना आजवर सातव्यांदा समन्स बजावलं आहे. हे समन्स वेळोवेळी केजरीवालांनी धुडकावून लावलं.
ईडीची समन्स बेकायदा असल्याचं आपनं म्हटलं आहे. तसेच ईडी याचसाठी समन्स पाठवत आहे की, कारण हे समन्स केवळ धमकावण्यासाठीच आहे कुठल्याही चौकशीसाठी नाही. आम्हाला भाजपला हे सांगायचं आहे की केजरीवाल अशा प्रकारच्या कुठल्याही बेकायदा समन्सला घाबरणारे नाहीत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.