Arvind kejriwal  Sakal
देश

INDIA Mumbai Meeting: अरविंद केजरीवाल यांना 'इंडिया'च्या पंतप्रधान पदाचे उमेदवार करा; 'आप'ने केली मागणी

कार्तिक पुजारी

Arvind Kejriwal can be prime minister candidate for india alliance said aap

नवी दिल्ली- विरोधी पक्षांची आघाडी इंडियाची बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी होत आहे. बैठकीआधी आम आदमी पक्षाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार बनवण्याची मागणी केली आहे. आम आदमी पक्षाच्या प्रवक्त्या पियंका कक्कर म्हणाले की, देशातील महागाई पाहता अरविंद केजरीवाल यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार बनवलं जावं.

तुम्ही मला विचारत असाल तर अरविंद केजरीवाल पंतप्रधान पदाचे उमेदवार बनावेत असं मला वाटतं. देशभरात महागाईमुळे लोकांचे हाल होत आहेत. त्यामानाने देशाची राजधानी दिल्लीमध्ये महागाई सर्वात कमी आहे, असं त्या म्हणाल्या. इंडिया आघाडी बैठक मुंबईतील ग्रँड हयात येथे पार पडणार आहे. त्यानिमित्त मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेही बैठकीला उपस्थिती लावणार असल्याची माहिती आहे.

दिल्लीमध्ये मोफत पाणी, मोफत वीज, मोफत शिक्षण, महिलांसाठी मोफत बस सेवा, वृद्धांसाठी मोफत तीर्थ यात्रा अशा सुविधा दिल्या जात आहेत. याशिवाय सरप्लस बजेट सादर केला गेला. अरविंद केजरीवाल सतत नेहमी लोकांचे प्रश्न उपस्थित करत असतात. पंतप्रधान मोदी यांना आव्हान देण्यासाठी केजरीवाल हेच सक्षम आहेत. तेच त्यांना आव्हान देऊ शकतात. असं प्रियंका कक्कर म्हणाल्या.

मेक इंडिया नंबर 1 मिशन अंतर्गत आमची इच्छा आहे की देशामध्येच सर्व वस्तूंची निर्मिती व्हावी. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या लाल किल्ल्यावरील भाषणात म्हटलं होतं की, वस्तूंची आयात वाढल्यास, महागाईचा दर वाढतो. पंतप्रधान मोदी यांच्याकडे अर्थव्यवस्थेसंबंधी काही योजना नाही, त्यामुळे असं होत आहे. याठिकाणी उत्पादन निगेटिव्हमध्ये सुरु आहे.

केजरीवाल यांच्या व्हिजननुसार भारत मॅन्युफॅक्चरिंग हब होईल. त्यांच्या निर्णयामुळे लायसेन्स राज सपेल. व्यापाऱ्यांना काम करण्यासारखे वातावरण मिळेल. शिक्षण त्याच्या उच्च स्तरावर असेल. लहान मुले शोध लावण्याचा विचार करतील. शिक्षण असे असेल की परदेशातील विद्यार्थी डॉलर खर्च करुन भारतात शिक्षणासाठी येतील. पंतप्रधान मोदींनी किती व्यापाऱ्यांचे कर्ज माफ केले? इतक्या पैशांमध्ये कित्येक राज्यांना मोफत वीज देता आली असती, असंही त्या म्हणाल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT