Rahul Gandhi 
देश

Rahul Gandhi : राजस्थानात राजकीय पेच! राहुल गांधी मात्र मुलांसोबत खेळण्यात मग्न

भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी हे लहान मुलांसोबत फुटबॉल खेळण्यात व्यस्त असल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

केरळ : राजस्थानमध्ये राजकीय पेचप्रसंगाची स्थिती निर्माण झालेली असताना दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी केरळमध्ये लहान मुलांशी फुटबॉल खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. भारत जोडो यात्रेनिमित्त राहुल गांधी सध्या केरळमध्ये आहेत. (as the game goes on in Rajasthan Rahul Gandhi plays ball with Kerala kids)

राहुल गांधींचा हा मुलांसोबतचा फुटबॉल खेळतानाचा व्हिडिओ कॉंग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय की, या मुलांचं भविष्य योग्य मार्गावर आणलं जात असून यांच्यासाठी प्रत्येक अडचणीचा सामना करायचा आहे.

या ४० सेकंदाच्या व्हिडिओमध्ये लहान मुलं खेळाच्या जर्सीमध्ये पल्लकडच्या रस्त्यांवर फुटबॉल खेळताना दिसत आहेत. राहुल गांधी या मुलांशी संवाद साधताना दिसत आहेत. यातील एका मुलाकडून त्यांनी फुटबॉल घेतला आणि दुसऱ्या एका मुलाकडं टाकला. तसेच त्यांच्यासोबत फुटबॉलचा आनंद लुटला. यावेळी तिथं गोळा झालेल्या लोकांकडून हात उंचावून त्यांना प्रत्साहित करण्यात आलं, असा हा व्हिडिओ आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. जर ते ही निवडणूक जिंकले तर त्यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागणार आहे. त्यांच्यानंतर सचिन पायलट हे मुख्यमंत्री होतील असा अंदाज आहे. पण राजस्थानचे नवे मुख्यमंत्री होण्यास सचिन पायलट यांच्या नावाला गेहलोत समर्थक असलेल्या जवळपास ९२ आमदारांनी विरोध दर्शवत राजीनाम्याचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळं आता राजस्थान काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळं राजस्थानमध्ये मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2025 Auction नंतरचे सर्व १० संघ; कोणाकडे सर्वात जास्त खेळाडू, तर कोणाकडे किती उरले पैसे; पाहा एका क्लिकवर

Municipal Elections: मुंबईत शिवसेनेला उभारी मिळणार? महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार...

Unsold Player List IPL 2025 Auction: पृथ्वी, शार्दूल ते वॉर्नर यांच्यासह ११० खेळाडू राहिले अनसोल्ड, वाचा संपूर्ण लिस्ट

MLA Rohit Pawar : आपले उद्योग गुजरातला, तेथील ईव्हीएम महाराष्ट्रात

हैतीमध्ये अराजकता! टोळीयुद्धात शेकडो जणांचा मृत्यू, अल्पवयीन मुलांची टोळ्यांमध्ये भरती

SCROLL FOR NEXT