Asaduddin Owaisi said, How the procession went without permission Asaduddin Owaisi said, How the procession went without permission
देश

असदुद्दीन ओवैसींचा प्रश्न; दिल्ली पोलिसांना भूमिकेवर म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

हनुमान जयंतीनिमित्त दिल्लीच्या जहांगीरपुरीतील सी ब्लॉकमध्ये मिरवणूक परवानगीशिवाय कशी काढण्यात आली? मिरवणुकीत पिस्तुले आणि तलवारी उगारण्यात आल्या. यावेळी दिल्ली पोलिस मूक प्रेक्षक बनून बघत राहिले? विनापरवानगी मिरवणूक कशी काय निघू दिली, असा प्रश्न एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी विचारला. (Asaduddin Owaisi said, How the procession went without permission)

शोभायात्रेत शस्त्रे का दाखवली गेली? भडकावू घोषणाबाजी करण्यात आली. भगवे झेंडे फडकवण्याचा प्रयत्न का झाला? असे एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ओवैसी (Asaduddin Owaisi) म्हणाले. राकेश अस्थाना यांना विचारण्यात आले की, जहांगीरपुरीमध्ये काही लोकांनी मशिदीवरील भगवा ध्वज फडकवण्याचा प्रयत्न केल्यामुळे दंगल उसळली होती का? प्रत्युत्तरादाखल राकेश अस्थाना यांनी भगवा झेंडा फडकावण्याची घटना फेटाळून लावली. शोभा यात्रेत कोणीही मशिदीवर भगवा झेंडा फडकावण्याचा प्रयत्न केला नाही, असे ते म्हणाले होते.

जहांगीरपुरी (Jahangirpuri violence case) येथे शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त (Hanuman Jayanti) निघालेल्या मिरवणुकीत दोन समुदायांमध्ये हिंसक हाणामारी झाली. याप्रकरणी पोलिसांनी २३ जणांना अटक केली आहे. त्यामध्ये दोन अल्पवयीन आहेत. दोन आरोपी पोलिस कोठडीत आहेत, तर १२ आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. जहांगीरपुरी हिंसाचाराचा तपास करण्यासाठी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने १४ पथके तयार केली आहेत.

अफवांकडे लक्ष देऊ नका

सोशल मीडियावर (Social media) पसरणाऱ्या कोणत्याही अफवांकडे लोकांनी लक्ष देऊ नये, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. आम्ही सोशल मीडियावर बारीक लक्ष ठेवून आहोत. ट्विट किंवा फेक न्यूज करून लोकांना भडकवण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारची अफवा पसरवताना दिसणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिस आयुक्त म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Resignation: CM एकनाथ शिंदे यांचा राजीनामा , बनणार काळजीवाहू मुख्यमंत्री, कोणते अधिकार कमी होणार ?

Satara Election result : शंभूराज, मकरंद, शिवेंद्रसिंहराजे चर्चेत, मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतरच मंत्रिमंडळाचा निर्णय?

"कोण किशोर कुमार ?" आलियाच्या प्रश्नाने रणबीरला बसला धक्का ; म्हणाला...

Constitution Day 2024 : संविधान दिन साजरा करताय ? आधी आपल्या जबाबदाऱ्या जाणून घ्या

Latest Maharashtra News Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा

SCROLL FOR NEXT