Asaduddin Owaisi Slam Pm Modi Over Doda encounter ghar me ghus ke marenge  
देश

Jammu Kashmir Terror Attack : पीएम मोदी म्हणायचे की घरात घुसून मारू, मग आता...; ओवेसींची सरकारवर सडकून टीका

रोहित कणसे

गेल्या काही दिवसांपासून जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांची संख्या वाढलीय. यादरम्यान ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुस्लीमीन (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी जम्मू-काश्मीरमधील डोडा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला.

'पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठमोठे बोलायचे. ते म्हणत होते की, घरात घुसून मारू. मग हे सगळं काय होतंय? हे सरकारचे पूर्ण अपयश आहे. दहशतवादावर नियंत्रण ठेवू शकत नाहीयेत. पुढे बोलतना ओवेसी म्हणाले की, डोडामध्ये जे काही घडले, ते ठिकाण एलओसीपासून दूर आहे. त्यामुळे ही बाब अत्यंत धोकादायक आहे.

डोडामध्ये काय झालंय?

जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात हत्यारबंद दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत एक कॅप्टन जखमी तर लष्कराचे ४ जवान शहीद झाले आहेत. अधिका-यांनी सांगितले की, अतिरेक्यांना शोधण्यासाठी आणि त्यांचा खात्मा करण्यासाठी अतिरिक्त दल पाठवण्यात आले आहे. कॅप्टन ब्रिजेश थापा, नाईक डी राजेश, कॉन्स्टेबल बिजेंद्र आणि कॉन्स्टेबल अजय अशी या चकमकीत शहीद झालेल्या जवानांची नावे आहेत. डोडा जिल्ह्यातील जंगलात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गेल्या तीन आठवड्यांतील ही तिसरी मोठी चकमक आहे.

7 महिन्यांत 6 दहशतवादी हल्ले

डोडा दहशतवादी हल्ल्याबाबत काँग्रेसनेही केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. सात महिन्यांत सहा दहशतवादी हल्ले सरकारचे सर्व दावे खोडून काढतात आणि अशा परिस्थितीत सुरक्षा रणनीतीत काळजीपूर्वक बदल करण्याची गरज असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT