Rahul Gandhi and asaduddin owaisi  
देश

Rahul Gandhi : ...तर भारत जोडोमध्ये फिरणारा राहुल गांधींचा आत्मा आहे का? ओवेसींचा खोचक टोला

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - हरियाणातील भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मी 'राहुल गांधींची हत्या केली' असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावरून एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी राहुल गांधी यांच्यावर खोचक टीका केली आहे. (asaduddin owaisi news in marathi)

ओवेसी म्हणाले की, राहुल गांधी मेले आहेत, मग या भारत जोडो यात्रेत फिरणारी आत्मा आहे का? याआधी हरियाणात भारत जोडो यात्रेचं प्रतिनिधित्व करताना राहुल गांधी म्हणाले होते की, आपण राहुल गांधींची हत्या केली आहे, त्यामुळे आपल्याला आता प्रतिमेची चिंता नाही. (Rahul Gandhi news in Marathi)

ओवेसी राहुल गांधींवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. ते पुढं म्हणाले की, राहुल गांधींना थंडीच्या हंगामातही थंडी वाजत नाही. वयाच्या पन्नाशीत त्यांना थंडीची भीती वाटत नाही. वास्तविक दिल्ली एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली आहे.

राहुल पंतप्रधान होण्याचं स्वप्न तर पाहात नाही ना, असा प्रश्नही ओवेसी यांनी विचारला. या टीकेला प्रत्युत्तर देताना काँग्रेसने म्हटले की, ओवेसी हे भाजपची बी टीम आहेत, त्यामुळेच ते राहुल गांधी आणि काँग्रेसवर सतत हल्ले करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Patil: पवारांची साथ मिळूनही हर्षवर्धन पाटलांसाठी निवडणूक सोप्पी नाही? घरातूनच बसला धक्का

Pune News : नव्या पाहुण्यासाठी हवा सरकारी दवाखाना; खासगीपेक्षा अधिक पसंती, अडीच वर्षांत ६९ हजार प्रसूती

Sakal Podcast: अमेरिकेत ट्रम्प येणार की हॅरिस? ते अर्जुन तेंडुलकर CSK च्या जर्सीत दिसणार?

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

BJP With Mns: शिवडीत मनसेच्या बाळा नांदगावकरांना भाजपचे समर्थन, आशीष शेलारांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT