Assembly Election 2023 PM Narendra Modi brand eSakal
देश

Assembly Election 2023 : मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार दिला नाही... 'ब्रँड मोदीं' वर शिक्कामोर्तब, अशी होती भाजपची 'स्ट्रॅटजी'!

विधानसभा निवडणूकांमध्ये बीजेपीनं जे यश संपादन केलं आहे, त्याच्या स्टॅटर्जीविषयी आता चर्चा सुरु झाली आहे.

युगंधर ताजणे

Assembly Election 2023 PM Narendra Modi brand : मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि राजस्थानमधील चित्र आता स्पष्ट होऊ लागले आहे. त्याठिकाणी भाजपनं आपले स्थान निर्माण करत पुन्हा एकदा कॉग्रेसला पराभूत केले आहे. बहुतांशी ठिकाणी भाजपनं सत्ता मिळवत आपणच प्रमुख सत्ताधारी पक्ष असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.

त्या तीन राज्यांमधील बीजेपीच्या विजयानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा ब्रँड पुन्हा एकदा ठळकपणे समोर आल्याचे दिसून आले आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ मधील निवडणूक ही मोदी यांचा चेहरा समोर ठेवून लढवण्यात आली होती. त्याला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.

Healthy Homes का वाढते आहे आरोग्यपूर्ण घरांची मागणी?

लोकसभा निवडणूकांच्या पूर्वी बीजेपीसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मध्य प्रदेशमध्ये पुन्हा एकदा बीजेपीनं मोठं यश संपादन केलं आहे. दुसरीकडे राजस्थानमध्ये बीजेपीनं पाच वर्षानंतर पुनरागमन केले आहे. छत्तीसगढच्या बाबत बोलायचे झाल्यास गेल्या निवडणूकांच्या तुलनेत यंदा चांगली लढत पाहायला मिळाली आहे. त्यात बीजेपीनं प्रभावी कामगिरी केली आहे.

मुख्यमंत्रीपदाचा चेहरा स्पष्ट नाही...

छत्तीसगढमध्ये बीजेपीनं कॉग्रेसला चांगलाच दणका दिला आहे. तीन ही राज्यांमध्ये बीजेपीनं आपली चुणूक दाखवून दिली आहे. ब्रँड मोदीचा प्रभाव दिसून आला आहे. मोदींचा चेहरा निवडणूकांमध्ये महत्वाचा ठरल्याचे दिसून आले आहे. बीजेपीनं निवडणूकांसाठी तिकिटांचे वाटप तर केव्हाच केले होते. पण कोणत्याही राज्यात मुख्यमंत्रीपदासाठी चेहरा कोण असेल हे मात्र स्पष्टपणे सांगितले नव्हते.

२०१८ मध्ये बीजेपीनं मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहान, राजस्थानमध्ये वसुंधरा राजे आणि छत्तीसगढ मध्ये रमन सिंह हे उमेदवार घोषित करण्यात आले होते. मात्र त्याचा परिणाम असा झाला की, त्या तीनही राज्यांमध्ये बीजेपीला मोठा फटका बसला होता. पराभवाला सामोरं जावं लागलं. आता मात्र राज्यांमध्ये बीजेपीनं बाजी मारली असून मुख्यमंत्री कोण हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

मध्यप्रदेश अन् राजस्थानमध्ये केलं होतं खास प्लॅनिंग...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा यंदाच्या निवडणूकांमध्ये महत्वाची भूमिका निभावताना दिसला आहे. त्यामुळे भाजपला जे काही यश मिळाले आहे ते मोदी यांच्यामुळे मिळाल्याच्या प्रतिक्रियांना उधाण आले आहे. हिंदी भाषिक पट्ट्यातील त्या राज्यांमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सभा, रॅली पार पडल्या होत्या. त्याला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. भाजपच्या निवडणुकांच्या घोषणा देखील मोदींशी संबंधित होत्या. मध्य प्रदेशामध्ये एमपी के मन में मोदी है तर राजस्थान मध्ये देखील मोदी साथे अपनो राजस्थान ही घोषणा लोकप्रिय झाली होती.

रोड शो, रॅली अन् बरचं काही...

त्या तीनही राज्यांमध्ये २ ते २७ नोव्हेंबर दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४२ रॅली आणि चार मोठे रोड शो केले होते. त्याचाही मोठा परिणाम दिसून आला. त्यात सगळ्यात मोठा प्रतिसाद मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये पाहायला मिळाला. मध्य प्रदेशमध्ये मोदींच्या १५ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. राजस्थानमध्ये देखील १५ रॅली पार पडल्या. तर छत्तीसगढमध्ये मोदींच्या ४ रॅली झाल्या.

मोदींच्या नावाची जादू कायम...

मतदारांनी दिलेल्या कौलविषयी शिवराज सिंह यांनी सांगितले की, एमपी मधील लोकांच्या मनात मोदी आहेत. मोदीजींच्या मनात देखील एमपी ची लोकं आहेत. त्यांनी याठिकाणी ज्या रॅली, सभा घेतल्या त्याला लोकांचा, मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. मोदींचा प्रभाव काय आहे हे मतदारांनी दाखवून दिले आहे.

युपीचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्या यांनी एक्सवरील त्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, भारताच्या जनतेच्या मनात मोदी आहेत आणि मोदींच्या मनात भारत आहेत. याबरोबरच बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी देखील प्रधानमंत्री यांच्या नावाचा जलवा आहे. अशी पोस्ट सोशल मीडियावर शेयर केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT